रिक्त पदांमुळे आरोग्य यंत्रणा ‘सलाईनवर’  sakal
सातारा

सातारा : रिक्त पदांमुळे आरोग्य यंत्रणा ‘सलाईनवर’

निम्म्याहून अधिक पदे सध्या रिक्त असल्याने येथील रुग्णसेवा गेल्या काही दिवसांपासून ‘सलाईनवर’ आहे.

तानाजी पवार

वहागाव : उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्रात मंजूर असणाऱ्या पदांपैकी निम्म्याहून अधिक पदे सध्या रिक्त असल्याने येथील रुग्णसेवा गेल्या काही दिवसांपासून ‘सलाईनवर’ आहे. त्यामुळे रुग्ण व आरोग्य कर्मचाऱ्यांत वादाचे खटके उडत आहेत.

उंब्रज केंद्रांतर्गत उंब्रज, अंधारवाडी, चरेगाव, तळबीड, बेलवडे हवेली, वहागाव व खोडशी या सात उपकेंद्रांतर्गत परिसरातील सुमारे २४ गावांतील ७५ हजार रुग्णांना अत्यावश्यक सेवा देण्याची जबाबदारी आहे. यासाठी येथे तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांसह सुमारे २४ आरोग्य कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत अपुरे मनुष्यबळ असतानाही हॉटस्पॉट ठरलेल्या वनवासमाची, तळबीडमधील साथ आटोक्यात आणण्यासाठी तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कुंभार यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने चांगले प्रयत्न केले.

त्यांची बदली झाल्याने आणि अन्य एका वैद्यकीय अधिकाऱ्यांची बदली झाल्याने दोन पदे रिक्त आहेत. त्यामुळे सध्या मंजूर पदांपैकी केवळ एका वैद्यकीय अधिकाऱ्यावर या आरोग्य केंद्राची जबाबदारी आहे. त्यांना दिवस-रात्र काम करावे लागत असल्याने त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. आरोग्य केंद्रातील १३ आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे सध्या हजर असणाऱ्या येथील महिला वैद्यकीय अधिकाऱ्यास आपल्या इतर ११ सहकाऱ्यांच्या मदतीने ७५ हजार लोकांच्या रुग्णसेवेची जबाबदारी पार पाडावी लागत आहे. वरिष्ठांनी लक्ष देऊन तेथे तत्काळ योग्य त्या उपाययोजना करण्याची गरज आहे.

आशा स्वयंसेविकांच्या संपाने हैराण...

गावागावांमधील आशा स्वयंसेविका या आरोग्य यंत्रणेचा कणा म्हणून काम करतात. कोरोना काळात राज्यात हॉटस्पॉट ठरलेल्या वनवासमाची, तळबीड आदी परिसरातील आशांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून कर्तव्य पार पाडले. मात्र, याच आशांना चार महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही. त्यामुळे त्या संपावर गेल्या आहेत. परिणामी, त्यामुळे आरोग्य यंत्रणेची एक बाजू निकामी झाल्यासारखी अवस्था झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

Best Mileage Bikes : कमी पेट्रोलमध्ये जास्त चालतात 'या' 5 दमदार बाईक्स; सर्वाधिक मायलेज अन् किंमत लाखाच्या आतच

वल्लरीचा खोटेपणा उघड होणार? तू हि रे माझा मितवा मधील ट्विस्टने प्रेक्षक चकित

SCROLL FOR NEXT