Satara
Satara 
सातारा

कोरोनाच्या भीतीने घरगुती औषधांचा सपाटा!, ग्रामीण भागातील स्थिती

केराप्पा काळेल

कुकुडवाड (जि. सातारा) : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने सर्दी, ताप, खोकला होणे साहजिक आहे. यात चिमुकल्यांचा समावेश अधिक दिसून येतो. मात्र, सर्दी, खोकला, ताप होताच रुग्णांनी डॉक्‍टरांकडे जाण्याऐवजी घरच्या घरी घरगुती औषधे करण्याचा सपाटा लावला आहे. हा सर्व प्रकार कोरोनाच्या भीतीने होत असल्याचे सांगण्यात येत आहे. 

सध्या जगभर पसरलेल्या कोरोनाच्या महामारीची लक्षणे ही या संसर्गाच्या निगडित असल्याने लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. पावसाळ्यात सर्दी हा शब्द हमखास ऐकायला मिळतो. पण, यावर्षीची स्थिती मात्र वेगळी आहे. कोरोनाच्या प्रकोपामुळे साधी सर्दी, खोकला, शिंका आल्या तरी जवळपासच्या लोकांना धडकी भरते आहे. ग्रामीण भागातील अनेक लोक सर्दी, खोकला होऊ नये म्हणून मिठ टाकून गरम पाण्याने गुळण्या करणे, आयुर्वेदिक काढा आणि योग्य आहार अशा प्रकारचे वेगवेगळे उपाय करताना दिसत आहेत.

यावर्षी साथीच्या आजाराच्या "साथीला' कोरोना विषाणू आल्यामुळे घरोघरी लोकांना दवाखान्यात जाण्याची भीती वाटत आहे. आरोग्य विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. मास्क वापरणे, गर्दीच्या ठिकाणी, आजारी व्यक्तीच्या संपर्कात जाणे टाळावे, अनेक खासगी दवाखान्यांत रुग्णांना सर्दी, खोकला आणि ताप असल्यास म्हसवड, पुळकोटी किंवा दहिवडीला सरकारी दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे रुग्ण घरगुती उपाय करून बरे होत आहेत. 


खबरदारी हाच उपाय...

किरकोळ सर्दी, पडसे, खोकला, अंगदुखी, ताप यांसारखे आजार असल्यास घराबाहेर पडू नये. घरीच थांबावे, घरातच योग्य औषध घ्यावे. जास्त त्रास वाटल्यास त्वरित डॉक्‍टरांकडे जावे. मास्क, सामाजिक अंतराचे पालन करावे, जेणेकरून आपला संसर्ग दुसऱ्यास होणार नाही तर दुसऱ्याचा आपल्याला होणार नाही आदी प्रबोधन गावोगावी सुरू आहे. 

संपादन : पांडुरंग बर्गे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', थालावर भडकला चेन्नईचा माजी स्टार खेळाडू

Latest Marathi News Update : गाझियाबादमध्ये अग्नितांडव, अग्निशमन दलाच्या 18 गाड्या घटनास्थळी हजर

Bajrang Punia : नाडाकडून बजरंग पुनिया निलंबित नमुना; चाचणीला नकार,कुस्ती संघटना ‘वाडा’शी संपर्क साधणार

Aerobic Exercise : वजन कमी करण्यासाठी घरच्या घरी करा ‘हे’ एरोबिक व्यायाम प्रकार, मानसिक अन् शारिरीक आरोग्य राहील तंदूरूस्त

Pune News : क्रिकेटच्या चेंडूने घेतला होतकरू खेळाडूचा बळी! अवघड जागी चेंडू लागल्यामुळे ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यु

SCROLL FOR NEXT