karad 
सातारा

या शहरात भीषण आग; दहा लाखांचे नुकसान

सचिन शिंदे

कऱ्हाड ः येथील शाहू चौकातील दोन दुकानांना 13 जुलैला रात्री उशिरा लागलेल्या आगीत सुमारे दहा लाखांचे नुकसान झाले. नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांसह नागरिकांनी ही आग आटोक्‍यात आणली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, शार्टसर्किटने ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. 

शाहू चौकातील शहा बंधूंचे नारळ व मोबाईल शॉपी दुकानाला आग लागली. आगीत सर्व साहित्य जळून खाक झाले. त्यात सुमारे दहा लाखांचे नुकसान झाले आहे. काल रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. दुकानातून धूर येऊ लागल्याने शेजारील दुकानाचे मालक श्री. शाह व काही नागरिकांनी याबाबतची कल्पना शहा बंधूंना दिली. काही वेळेतच दुकानचे मालकही घटनास्थळी पोचले. त्यांनी दुकान उघडून पाहिले. मात्र, तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. आग पसरल्याने ज्वाळांनी दुकान व्यापून टाकले. घटनेची माहिती मिळताच तेथे पोचलेल्या अग्निशामक दलाने ही आग विझवली. त्यात काही कालावधी गेल्याने तोपर्यंत दुकानातील बराचसा भाग जळून खाक झाला होता. त्यात सुमारे दहा लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 

(संपादन ः संजय साळुंखे) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शासनाची भन्नाट योजना! ३ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या गरजूंना आता न्यायालयातील केससाठी मिळणार मोफत वकील; जन्मदाखला काढण्यासाठीही विनाशुल्क मदत, वाचा....

आजचे राशिभविष्य - 14 ऑगस्ट 2026

आरोग्य स्वातंत्र्य की रोगाचे पारतंत्र्य

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 14 ऑगस्ट 2026

ढिंग टांग : झुरळांचा झपुर्झा..!

SCROLL FOR NEXT