flood  sakal
सातारा

कऱ्हाड : पूररेषेच्या निर्णयाविना नुकसानीचा फटका

स्वतंत्र अभ्यास गट स्थापन होऊनही दुर्लक्ष झाल्याचा परिणाम

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : कोयनेसह कृष्णा नद्यांच्या काठावरील गावांत दरवर्षी उद्भवणाऱ्या महापुराच्या अभ्यासासह पूररेषेचा निर्णय यंदाही अधांतरीच राहिला आहे. त्याचा फटका सातारा, सांगली जिल्ह्याला याहीवर्षी बसणार आहे. निर्णयाअभावी काठावरील गावांना यंदाही महापुराने होणाऱ्या नुकसानीला सामोरे जावे लागण्याची भीती आहे. त्यामुळे यंदाही कोट्यवधींच्या हानीची शक्यता व्यक्त होत आहे. दरवर्षी कोयनेसह कृष्णा काठावरील शेकडो गावांतील लाखभर लोकांचे स्थलांतर, पुरातील कोट्यवधींच्या हानीसह ठोस उपायांसाठी शासकीय पातळीवर आश्वासनांची खैरात होत आहे.

महापुराच्या अभ्यासासाठी स्वतंत्र गटाची स्थापना करण्यापलीकडे आजअखेर हालचालीच झाल्या नाहीत. यंदाही पूररेषेबाबत धोरणात्मक निर्णय न झाल्याने पुरामुळे कोट्यवधींची हानी सोसावी लागत आहे. पूररेषेला झालेला विरोध, निधी फिरवताना अंतर्गत अनियमितेमुळे पूररेषा ठरविण्याकडे दुर्लक्ष झाल्याचे वास्तव आहे. त्याचा मोठा फटका पूरग्रस्त भागाला बसतो आहे. सातारा, सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यात मागील वर्षी सुमारे पावणेचार लाख लोकांना पुराचा फटका बसला. त्यात कोट्यवधींची हानीही झाली. २५ वर्षांनंतर मागील वर्षीची स्थिती झाली होती. त्याच्या अभ्यासासाठी शासनाने पुढाकार घेतला. मात्र, पुढे काहीच झाले नाही.

नदीकाठी पुरासोबत अस्वस्थतेचे वारे...

महापुराच्या कारणांचा अभ्यास करताना सगळ्याच प्रमाणांचा विचार होतो. जिल्ह्यातील कोयना, मोरणा-गुरेघर, तारळी, उत्तरमांड, महिंद, चिटेघर, धोम, कण्हेर आणि उरमोडी आदी धरणांच्या पाण्याची आवक कृष्णेत होते. त्यानंतर वारणा, पंचगंगाही कृष्णेत मिसळते. त्याचाही अभ्यास होणार होता. धरणांच्या क्षमता तपासल्या जाणार होत्या. मात्र, यातील काहीच झाले नसल्याने त्या नद्यांच्या काठावर पुन्हा पुरासोबतच अस्वस्थतेचे वारे वाहत आहे.

कृष्णा नदीचा अभ्यास कधी?

कृष्णा नदीत कोयना, वेण्णा, उरमोडी, तारळी, कुडाळी, केरा, मोरणा, वांग, वारणा, कडवी, शाली, अंबरडे, कुंभी, कासारी, गरवाली, जांभळी, सरस्वती, धामणी, तुळशी, भगवती, दूधगंगा, वेदगंगा, हिरण्यकेशी, घटप्रभा, ताम्हपाणी, मार्कंन्डीय, मलप्रभा आदी नद्या मिळतात. त्या सगळ्यांचा पाण्याचा प्रवाह कृष्णा नदीत मिसळतो. त्यामुळे कृष्णा नदीची व्याप्ती वाढते. त्याचाही अभ्यास होणार होता. त्याला अत्याधुनिक व शास्त्रोक्त पद्धतीचीही गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT