सातारा

सातारा : 'या' तालुक्यांतील काेराेना बाधितांची संख्या पुन्हा वाढली

सकाळ वृत्तसेवा

सातारा : सातारा जिल्ह्यात काेराेना बाधितांची संख्या 1045 इतकी झाली आहे. आज (मंगळवार) कृष्णा मेडिकल कॉलेज (कराड) येथे उपचार घेत असलेल्या 14 नागरिकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती  जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

यामध्ये पाटण तालुक्यातील शेंडेवाडी (कुंभारगाव) येथील 18 वर्षीय युवक, 45 व 20 वर्षीय महिला, 42 वर्षीय पुरुष, कुसरुंड येथील 40 वर्षीय पुरुष, चोपडी येथील 60 वर्षीय महिला, कराड येथील गजानन हौसिंग सोसायटी येथील 40 वर्षीय पुरुष, चरेगाव येथील 32 वर्षीय पुरुष , शिवडे येथील 36 वर्षीय पुरुष, तारुख येथील 70 वर्षीय पुरुष, कोयना वसाहत येथील 10 वर्षाचा मुलगा, विद्यानगर, सैदापूर येथील 26 वर्षीय महिला,मलकापूर येथील 26 वर्षीय पुरुष, नडशी येथील 31 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.

145 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह 

एन.सी.सी.एस., पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 145 जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तसेच 27 जून रोजी एन.सी.सी.एस. पुणे  यांनी कळविलेल्या रिपोर्टमधील 55 वर्षीय पुरुष हा गोडोली येथील असल्याचे कळविले होते, परंतु त्याचे मुळ गाव पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे (ता. मावळ) असल्याने या बाधिताची नोंद जिल्ह्यातून वगळण्यात आली आहे, असेही डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.

दरम्यान साेमवारी रात्री उशिरापर्यंत सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधितांमध्ये  58 रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येने एक हजाराचा टप्पा ओलांडला. साेमवारी सकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये 39 रुग्ण पॉझिटिव्ह निघाले. त्यानंतर रात्री आठ वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 19 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. 

काळजीत पडला सातारा जिल्हा; लहान बालकांना कोरोनाची बाधा; संख्या हजारी पार

साेमवारी रात्रीच्या रिपोर्टमधील पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 12 पुरुष व सात महिलांचा समावेश असून, त्यातील 4 प्रवासी, 10 निकटसहवासित आणि 5 सारीचे रुग्ण आहेत. जावळी तालुक्‍यातील रामवाडीतील 48 वर्षीय पुरुष व 22 वर्षीय युवक, 42, 48, 43 व 55 वर्षीय महिला, बामणोली तर्फ कुडाळमधील 46 वर्षीय पुरुष, आखेगणीतील 16 वर्षीय युवक, खंडाळा तालुक्‍यातील शिरवळमधील 83 वर्षीय वृद्ध व 31 वर्षीय महिला, सातारा तालुक्‍यातील दौलतनगरातील 39 वर्षीय पुरुष, रेल्वे स्टेशन कॉर्टरमधील 39 वर्षीय पुरुष, जिहे येथील 68 वर्षीय पुरुष, लिंबमधील 40 वर्षीय 2 पुरुष, क्षेत्र माहुलीतील 50 वर्षीय पुरुष, वाई तालुक्‍यातील धर्मपुरीतील 35 वर्षीय पुरुष व ब्राह्मणशाही येथील 68 वर्षीय महिला, माण तालुक्‍यातील खडकी (पाटोळे) येथील 54 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

सकाळ सकाळी दाेघांच्या मृत्यूची बातमी धडकली, या जिल्ह्यात काेराेनासह सारीचा प्रादुर्भाव वाढताेय 

साेमवारी दिवसभरात सात रुग्ण कोरोनामुक्त 

दिवसभरात सात नागरिकांना आज कोरोनामुक्त झाल्याने दहा दिवसांनंतर घरी पाठविण्यात आले. घरी सोडण्यात आलेल्यांमध्ये मुंबई चेबूर येथील 51 वर्षीय महिला, जावळी तालुक्‍यातील गांजेतील 45 वर्षीय महिला, कोरेगाव तालुक्‍यातील पवारवाडीमधील 48 वर्षीय पुरुष, 38 व 21 वर्षीय महिला, 17 वर्षाचा युवक, पाटण तालुक्‍यातील धामणी येथील 21 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT