karad
karad 
सातारा

"कृष्णा'तर्फे शेतकऱ्यांना फळझाडांची रोपे

सकाळ वृत्तसेवा

रेठरे बुद्रुक (जि. सातारा) : येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने शेतकरी सभासदांना दरवर्षी दर्जेदार योग्य दरात फळझाडांची रोपे उपलब्ध करून दिली जातात. या उपक्रमांतर्गत कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते सभासद शेतकऱ्यांना फळझाडांच्या रोपांचे वाटप करण्यात आले. 

या कारखान्यातर्फे शेतकरी संवाद मेळावे, अल्पदरात द्रवरूप जिवाणू खते, सेंद्रिय खते, माती परीक्षण, मोफत साखर, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने ऊस नोंदी, सभासद शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीसाठी जयवंत आदर्श कृषी योजना यांसारखे उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमांबरोबरच कार्यक्षेत्रातील सभासदांना कारखान्याकडून दर्जेदार फळझाडांची रोपे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथून ही दर्जेदार फळझाडांची रोपे आणली असून, त्यात हापूस, केशर, दूधपेढा आंब्यांची रोपे, बाणवली नारळ, टी. डी. नारळ, ऑरेंज डॉर्फ नारळ, कालीपत्ती चिकू, साईशरबती लिंबू, लखनऊ पेरू, सफेद पेरू, बाळानगर सीताफळ, आवळा ही फळझाडांची तसेच काळीमिरी, दालचिनी ही मसाला झाडांची रोपे कारखाना कार्यस्थळावर उपलब्ध होणार आहेत. 

डॉ. भोसले यांच्या हस्ते सभासद शेतकऱ्यांना फळझाडांच्या रोपांचे वाटप करण्यात आले. यावेळी संचालक जितेंद्र पाटील, संजय पाटील, पांडुरंग होनमाने, सुजित मोरे, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, मनोज पाटील, मुकेश पवार, सी. एन. मिसाळ, प्रकाश सूर्यवंशी, पंकज पाटील, अरुण पाटील, रवींद्र देशमुख, जी. बी. मोहिते, नीलेश देशमुख, अजय दुपटे, शिवाजी बाबर, डॉ. हर्षल निकम, डॉ. विजय कुंभार, संपतराव पाटील उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Rohit Sharma Birthday : 'सलाम रोहित भाई...' मुंबईने टीम इंडियाच्या कर्णधारचा बड्डे अनोख्या पद्धतीने केला साजरा - Video

VIDEO: वडील असावेत तर असे! घटस्फोट झालेल्या मुलीचे माहेरी केले जंगी स्वागत; व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : उत्तर मुंबईचे भाजपचे उमेदवार पियुष गोयाल आज भरणार उमेदवारी अर्ज

SCROLL FOR NEXT