शिकाऱ्यांची टोळी जेरबंद; सहा हातबॉम्बसह दोन दुचाक्या जप्त  sakal
सातारा

सातारा : शिकाऱ्यांची टोळी जेरबंद; सहा हातबॉम्बसह दोन दुचाक्या जप्त

हात बॉम्ब दाखवताना त्यातील दोघे अंधाराचा गैरफायदा उठवत पसार

प्रा.राजेश पाटील

ढेबेवाडी : वनक्षेत्रात शिकार करण्यासाठी आलेल्या शिकारी टोळीला येथील वनविभागाच्या पथकाने सापळा रचून 'ऑन द स्पॉट' पकडले. संबंधितांकडून सहा जिवंत हातबॉम्ब, दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. कालरात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. आज सकाळी त्या परिसरात दोन रानडुक्करेही मृतावस्थेत आढळून आल्याने या घटनेची तीव्रता अधिकच वाढली आहे.

या प्रकरणात एकूण पाच सशयितांचा समावेश आहे. जागोजागी ठेवलेले हात बॉम्ब दाखवताना त्यातील दोघे अंधाराचा गैरफायदा उठवत पसार झाले असून तिघांना वनविभागाच्या पथकाने जेरबंद केल्याचे सांगण्यात आले.

याबाबत वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार,काल रात्री ढेबेवाडी वनक्षेत्रातील भोसगाव वनकक्ष क्रमांक ५५३ मध्ये शिकारी टोळी हात बॉम्ब गोळ्याच्या साह्याने रानडुकरांची शिकार करण्याच्या उद्देशाने आल्याची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने क्षणाचाही विलंब न लावता त्या परिसरात सापळा रचला,शिकाऱ्यांचा अचूक माग काढत वनविभागाची टीम तेथे पोहचताच संशयित शिकारी आढळून आले. त्यांना अधिक हालचालीला वाव न देता झडप टाकून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून शिकारीसाठी तयार केलेले सहा हातबॉम्ब व दोन दुचाकी जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणात एकूण पाच सशयितांचा समावेश आहे.

जागोजागी ठेवलेले हात बॉम्ब दाखवताना त्यातील दोघे अंधाराचा गैरफायदा उठवत पसार झाले असून तिघांना वनविभागाच्या पथकाने जेरबंद केल्याचे सांगण्यात आले पळून गेलेल्या संशयितांचा वनविभागाकडून काल रात्रीपासून कसून शोध सुरू आहे. उपवनसंरक्षक एम.एन मोहिते,सहायक वनसंरक्षक महेश झाजुरणे यांच्या मार्गदर्शनानुसार वनक्षेत्रपाल एल.व्ही पोतदार,वनपाल सुभाष राऊत,वनरक्षक जयवंत बेंद्रे,विशाल डुबल,सुभाष पाटील,सुरेश सुतार,अमृत पन्हाळे,नथुराम थोरात,अनिकेत पाटील,अजय कुंभार आदींनी ही कारवाई केली. सशयितांवर भारतीय वन्यजीव अधिनियम १९७२ चे कलम ९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आज त्यांना पाटण न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

दरम्यान आज सकाळी त्या परिसरात दोन रानडुक्करेही मृतावस्थेत आढळून आल्याने या घटनेची तीव्रता अधिकच वाढली आहे. खाद्य समजून बॉम्ब खाल्ल्याने रानडुक्करांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे,मात्र त्याचा नेमका तपशील उपलब्ध झालेला नाही. अवैध शिकारीचे प्रकार रोखण्यासाठी ढेबेवाडी वनक्षेत्रात वनविभागाने यापूर्वीच कडक पाऊले उचलली असून यापूर्वीही अनेक कारवाया करत मोकाट शिकऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT