man 
सातारा

बकरी ईदला रक्तदान; मुस्लीम समाजाने दिला अनोखा संदेश

फिराेज तांबाेळी

गोंदवले (जि. सातारा) : जातीने नव्हे तर रक्ताने नाते जोडूया! हा संदेश देत गोंदवले बुद्रुकच्या (ता. माण) मुस्लिम बांधवांनी बकरी ईददिवशी रक्तदानाची परंपरा कायम राखली. सलग पाचव्या वर्षी ईदनिमित्त हा उपक्रम राबवून जातीय सलोखा राखण्याचा प्रयत्न होत असल्याने गोंदवलेकरांचे कौतुक होत आहे. 

येथील मुस्लिम समाज नेहमीच सामाजिक कामात सक्रिय असतो. दुष्काळात मोफत पाणीपुरवठा, मुख्यमंत्री निधीला मदत, हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना मदत, गेल्या वर्षी पूरग्रस्तांना मदत अशी विविध सामाजिक कामे या बांधवांकडून करून सामाजिक सलोखा राखण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो. रमजान ईदनिमित्त गरजूंना अन्नधान्य वाटप केले जाते. त्याचप्रमाणे बकरी ईदच्या दिवशी रक्तदान करून सर्वांसमोर आदर्श ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. 

यावर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे सर्वच सणांवर बंधने आली आहेत; परंतु या काळात अत्यावश्‍यक असलेल्या रक्तदानाची परंपरा मुस्लिम समाजाने यंदाही कायम ठेवली. ईदची नमाज घरीच अदा केल्यानंतर येथील ग्रामपंचायत सभागृहात सर्वधर्मीयांच्या सहभागाने रक्तदान शिबिर घेण्यात आले. पंचायत समितीचे उपसभापती तानाजीराव कट्टे, सरपंच अश्विनी कट्टे, उपसरपंच संजय माने यांच्या हस्ते शिबिराचे उद्‌घाटन झाले. त्या वेळी दहिवडीचे सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ, अंगराज कट्टे, प्रवीण भोसले, मुस्लिम समाज अध्यक्ष डॉ. समीर तांबोळी, डॉ. रज्जाक तांबोळी, ग्रामपंचायत सदस्य हाफीजा तांबोळी उपस्थित होते. मायणी वैद्यकीय महाविद्यालयातील रक्तपेढीचे डॉ. एस. जे. रायबोले व सहकाऱ्यांनी सहकार्य केले. या शिबिरात रक्तदान केलेल्या 25 दात्यांचा पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. 


गरजू रुग्णांना जीवनदान देण्यासाठी आम्ही गोंदवलेकर मुस्लिम बांधवांनी बकरी ईद दिवशी रक्तदानाची परंपरा यंदाही कायम राखली आहे. या उपक्रमातून सामाजिक सलोखा राखला जात असल्याने खूप समाधानी आहोत. 

- डॉ. समीर तांबोळी, गोंदवले बुद्रुक 

(संपादन ः संजय साळुंखे) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Missing Minors : मुंबई हादरली ! ३६ तासांत ८ मुलींसह १२ अल्पवयीन मुले बेपत्ता; पोलिसांकडून विशेष शोधमोहीम सुरू, हाय अलर्ट जारी

Pune News: बारामतीत साकारणार अजित पवार यांचे स्मारक; शरद पवार यांची इच्छा, विद्या प्रतिष्ठान संकुलातील जागा!

‘द केरळ स्टोरी 2: गोज़ बियॉन्ड’मधील प्रमुख महिला कलाकारांचे कॅरेक्टर पोस्टर्स प्रदर्शित

Pune News: राज्य शासनाचा माेठा निर्णय! भूसंपादनाची माहिती आता ऑनलाइन मिळणार; गैरप्रकाराला बसणार आळा..

Warren Buffett Index : दिशादर्शक वॉरेन बफेट निर्देशांक

SCROLL FOR NEXT