Satara 
सातारा

Video : गोंदवल्यात मंगलमय वातावरणात गुरुपौर्णिमा उत्साहात, यंदा ना वाहनांचे कर्कश हॉर्न, ना पोलिसांच्या शिट्ट्या

सकाळ वृत्तसेवा

गोंदवले (जि. सातारा) : फुलांनी सजवलेली "श्रीं'ची समाधी...सडा रांगोळ्यांनी सजलेले मंदिर...शांत वातावरणात अखंड पहाऱ्याच्या टाळाची किणकिण...मुखातून श्रीरामाचे अखंडित नाम...अशा मंगलमय वातावरणात येथील श्री ब्रह्मचैतन्य महाराज समाधी मंदिरात आज (रविवार) गुरुपौर्णिमेचा उत्साह पार पडला. मात्र, आज ना वाहनांचे कर्कश हॉर्न वाजले, ना पोलिसांच्या शिट्ट्यांची फुर्रर्र फुर्रर्र ऐकायला मिळाली. 

"श्रीं'च्या समाधी मंदिरात पौर्णिमेला भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी असते. गुरुपौर्णिमेला तर गुरू माउलींच्या समाधी दर्शनासाठी भाविक आवर्जून हजेरी लावतात. हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असल्याने येथे मोठी यात्राच भरते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज हा उत्साह पाहायला मिळाला नाही. समाधी मंदिरात अगदी मोजक्‍या भाविकांच्या उपस्थितीत आज विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.

नेहमीप्रमाणे अखंड पहारा, नामस्मरण सुरू होते.
 
समाधी मंदिर समितीच्या विश्वस्तांच्या हस्ते सकाळी समाधी, पादुकांचे पूजन करण्यात आले. मात्र, आजही मुख्य सभामंडपात गायन, कीर्तन झाले नाही. 
मंदिर परिसरातील दुकाने तीन महिन्यानंतर आज उघडली खरी, परंतु मंदिरात आणि रस्त्यावर आजही सामसूमच होती. समाधी दर्शनासाठी ना भाविकांच्या रांगा होत्या, ना रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होती. त्यामुळे ही दुकाने मात्र, ग्राहकांअभावी ओस पडलेली दिसत होती.

शासनाने अद्याप मंदिर खुले करण्यास परवानगी दिली नसल्याने समाधी मंदिराची प्रवेशद्वारे बंदच आहेत. मात्र, काही भाविकांनी बंद असलेल्या मुख्य द्वारापासूनच "श्रीं'च्या समाधीचे दर्शन घेतले. मंदिर समितीच्या वेब साइटवर आज पहाटे, दुपारी आणि रात्री थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. त्यामुळे परगावच्या असंख्य भाविकांनी घरातूनच ऑनलाइन दर्शनाचा लाभ घेतला. 

ना भाविक ना वाहने 

पोर्णिमेदिवशी गोंदवल्यातील मुख्य रस्त्यावर भविकांसह वाहनांची मोठी गर्दी असते. त्यामुळे वारंवार होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिस यंत्रणेची दमछाक होते. आज मात्र रस्त्यावर ना भाविक ना वाहने अशी अवस्था होती. त्यामुळे पोलिसांच्या शिट्ट्यांचा आवाज आज वाजलाच नाही. 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad: शिवभक्तांसाठी आनंदवार्ता! ३५० नाही तर ५० रुपयांत रोपवेने रायगडावर जाता येणार, महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय; नवा प्लॅन काय?

Theatre Collaboration : सहयोग, संवाद आणि विश्वासातून घडणाऱ्या नाटककलेचा सर्जनशील प्रवास

Ketan Agrawal Murder Case: केतन लोहगडवरून बचावला तर... सियाकडे होता 'प्लॅन बी', तपासात आणखी एक महत्त्वाचा खुलासा!

Indian Cinema History : ‘प्रकल्पवाटा’ पुस्तकातून उलगडते विद्यार्थीकेंद्रित प्रभावी आणि नावीन्यपूर्ण शिक्षणपद्धती

Rahuri Mystery: राहुरीत अनोखे रहस्य! शब्बीर जिवंत परतल्याने प्रशासन हादरले; कबरीतील मृतदेह कोणाचा, डीएनए अहवालावर नजर..

SCROLL FOR NEXT