ऐतिहासिक वास्तूंचा सुशोभीकरण आराखडा  sakal
सातारा

सातारा : ऐतिहासिक वास्तूंचा सुशोभीकरण आराखडा

कामाबाबत उदयनराजेंची वास्‍तुविशारदांशी चर्चा; नगरविकास विभागासमवेत होणार बैठक

सकाळ वृत्तसेवा

सातारा : किल्ले प्रतापगड आणि किल्ले अजिंक्यतारा येथे रोप वेचे काम प्रस्तावित आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या गडकिल्ल्यांसह शहरातील, तसेच जिल्‍ह्यातील ऐतिहासिक वास्तूंच्या सुशोभीकरण आराखड्यावर आज कोल्हापूर येथील वास्तुविशारद इंद्रजित नागेशकर यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी भेटीअंती चर्चा केली.

मराठा साम्राज्‍याच्‍या इतिहासात सातारा आणि किल्‍ले अजिंक्‍यतारा, प्रतापगड या ठिकाणांना अनन्‍यसाधारण महत्त्‍व आहे. अजिंक्‍यतारा, प्रतापगड आणि सज्‍जनगड येथे नागरिकांना जाणे- येणे सोपे व्‍हावे, यासाठी रोप वेचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे विचाराधीन आहे. याठिकाणांशिवाय जिल्ह्यातील इतर ऐतिहासिक वास्तूंचे सुरक्षित जतन करणे आवश्यक आहे. साताऱ्यातील कमानी हौद, नवीन, जुना राजवाडा, तसेच किल्‍ले अजिंक्‍यताऱ्यावरील राजसदर या वास्तूंच्या सुशोभीकरणावर बैठकीत चर्चा झाली.

पर्यावरणाच्‍या अनुषंगाने येणाऱ्या अडचणींबाबत येत्‍या दोन दिवसांत नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍यासमवेत बैठक आयोजित केल्‍याचेही श्री. उदयनराजे यांनी या वेळी श्री. नागेशकर यांना सांगितले. चर्चेअंती इंद्रजित नागेशकर यांनी किल्ले अजिंक्यतारा आणि किल्ले प्रतापगड येथील नियोजित सुशोभीकरणाची कामे व त्‍यासाठीच्‍या अंदाजपत्रकीय खर्चाची माहिती घेतली. माहिती घेत असतानाच या कामासाठी सोपवाल ती जबाबदारी निःस्पृहपणे पार पाडू, असे असा शब्‍द श्री. नागेशकर यांनी उदयनराजे भोसले यांना दिला. या वेळी मजीद शेख, अ‍ॅड. डी. जी. बनकर, काका धुमाळ, इर्शाद बागवान, बाळासाहेब ननावरे, संग्राम बर्गे, फिरोज शेख, अ‍ॅड. विनीत पाटील, सुभाष भोसले, गणेश चव्हाण आदी उपस्‍थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : अंधश्रद्धेचा कहर! मुलगा बरा व्हावा म्हणून आईने भोंदू मांत्रिकाच्या सांगण्यावरुन दिला मुलीचा नरबळी, राज्यात खळबळ

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये हनुमान जयंती निमित्ताने 51 फूट उंच मारुती च्या दर्शनाला गर्दी

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

SCROLL FOR NEXT