Satara Jawali army man Prathamesh Pawar passed away sakal
सातारा

सातारा : जावलीचे जवान प्रथमेश पवार यांना विरमरण

साडेदहाच्या सुमारस बामणोली तर्फ कुडाळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले

महेश बारटक्के

कुडाळ : सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील बामणोली तर्फ कुडाळ येथील जवान प्रथमेश संजय पवार आज अनंतात विलीन झाले. आज सकाळी साडेदहाच्या सुमारस बामणोली तर्फ कुडाळ येथील दत्तमंदिरानजीक मोकळ्या पटांगणावर शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा लहान भाऊ आदित्य पवार यांनी साश्रूनयनांनी मुखाग्नी दिला.शहिद जवान प्रथमेश यांना अखेरचा निरोप देण्यासाठी कुटुंबीय, मित्रपरिवारासह ,संपूर्ण जावळी तालुका, जिल्हाभरातून हजारो नागरिक बामणोली येथे आले होते. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.

बामणोलीसह आजूबाजूच्या गावागावात पहाटे पासूनच देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले होते. पुणे येथून त्यांचे पार्थिव सकाळी सात वाजता पाचवड ता. वाई येथे आणण्यात आले. येथून फुलांनी सजवलेल्या ट्रॉलीतून जवान प्रथमेश यांचे पार्थिव घेऊन निघालेली शोभायात्रा सरताळे, कुडाळ, शेते, सोमर्डी मार्गे, बामणोली तर्फ कुडाळ, डेरेवाडी येथे पोहचली. त्यानंतर त्यांच्या घरी पार्थिव नेण्यात आले, पार्थिव घरी पोहचताच जवान प्रथमेश यांच्या आईने व लहान भाऊ आदित्य यांनी केलेला आक्रोश उपस्थितीतांचे मन हेलावून टाकणारा होता.

परिसरातील गावागावातील आबालवृद्ध, महिला, युवक शहिद जवान यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठया संख्येने रस्त्यावर उभे होते. या अंत्ययात्रेत देशभक्तीपर गीतांबरोबरच 'भारत माता की जय', 'वंदे मातरम', 'अमर रहे... अमर रहे... शहीद जवान प्रथमेश पवार अमर रहे', अशा घोषणा देत होते. सकाळी 10.30 वाजता त्यांच्यावर अंत्यत शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, वसंतराव मानकुमरे, जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार, तहसीलदार राजेंद्र पोळ, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, अधिकारी, पदाधिकारी, माजी सैनिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day Live Update : मोदींचा मोठा संकल्प; स्वावलंबी भारतासाठी देशाला दिला खास संदेश

ASIA CUP 2026: जेमिमा रॉड्रिग्स आशिया कप आणि आशियाई खेळांमधून बाहेर; BCCI चा मोठा निर्णय, ‘या’ धडाकेबाज फलंदाजाला मिळाली संधी

शहर हद्दीतही दोन्ही बाजूला ३० मीटरचेच बंधन! महामार्गांलगतच्या हॉटेल, ढाब्यांवर ६० दिवसांत हातोडा; जिल्हाधिकाऱ्यांकडून ‘कृती दल’ स्थापन, वाचा...

Tricolor Cheese Toast Recipe: या स्वातंत्र्यदिनाला नाश्त्यात करा काहीतरी हटके! १० मिनिटांत बनवा चीजने भरलेला ‘तिरंगा टोस्ट’

Career Horoscope: सरकारी नोकरीत मिळवतात यश; ‘या’ राशींना मिळते नशिबाची साथ, करिअरमध्ये करतात मोठी प्रगती, तुमची रास कोणती?

SCROLL FOR NEXT