विवाहितेवर अत्याचार  Sakal
सातारा

सातारा : नोकरीचे आमिष दाखवून विवाहितेवर अत्याचार

‘बँकेत नोकरी लावतो, त्यासाठी तुला कॉम्प्युटर क्लास लावावा लागेल. मी तुला क्लास लावतो,’ असे आमिष दाखविले.

सुनील शेडगे

नागठाणे : विवाहितेला नोकरीचे आमिष दाखवून व तिच्या कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी देत वेळोवेळी अत्याचार केल्याप्रकरणी सासपडे (ता. सातारा) येथील युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंकज मोहन यादव (रा. सासपडे, ता. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. पंकज याने त्याच्या नात्यातील एका विवाहितेला ‘बँकेत नोकरी लावतो. त्यासाठी तुला कॉम्प्युटर क्लास लावावा लागेल. मी तुला क्लास लावतो,’ असे आमिष दाखविले. त्यानंतर घरात कोणीही नसताना त्याने तिच्याशी बळजबरी करत अत्याचार केला.

या वेळी तिचे अश्‍लील फोटो काढून ‘ही घटना कोणाला सांगितल्यास तुझे फोटो व्हायरल करेन. तुझा नवरा व मुलाला ठार मारेन,’ अशी धमकी दिली. त्यानंतर पंकजने वेळोवेळी तिच्यावर सातारा येथे लॉजवर व घरी अत्याचार केला. पीडित विवाहितेने त्याला टाळण्याचा प्रयत्न केला असता त्याने नवरा व भावाला ठार मारण्याची पुन्हा धमकी दिली. या घटनेची माहिती अखेर संबंधित विवाहितेने कुटुंबीयांना दिली. त्यानंतर त्यांनी बोरगाव पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. पोलिसांनी पंकज यादवच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक डॉ. सागर वाघ तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंचा रोख कुणाकडे? ''राज्यातील बड्या नेत्यांचं मला संपवायचं कारस्थान...''

IPL 2026 Marathi News: वैभव सूर्यवंशीला आयपीएल सुरू होण्यापूर्वी कॅप्टन रियान परागचा सल्ला; म्हणाला, त्यांच्यापासून दूर राहा...

Dombivli: डोंबिवलीत २८वी स्वागतयात्रा; संस्कृती आणि राष्ट्रभावनेचा भव्य संगम, यंदा काय खास ठरलं? जाणून घ्या...

Viral Video : ही तर साक्षात देवीच! निरागस डोळे अन् मोहक हास्य; अवघ्या 3 महिन्यांच्या चिमुकलीचं हे रूप पाहून तुम्हीही भारावून जाल, व्हायरल व्हिडिओने जिंकली लाखो हृदय

Junnar News : जुन्नरमध्ये डॉक्टरकडे खंडणीची मागणी; बेकायदेशीर बांधकामाचा धाक दाखवत ३५ लाखांची मागणी

SCROLL FOR NEXT