jawali 
सातारा

केळघर परिसरात वन्यप्राण्यांमुळे उभी पिके फस्त

संदीप गाडवे

केळघर (जि. सातारा) : गेल्या 15 दिवसांपासून परिसरात पडत असलेल्या संततधार पावसामुळे बटाटा, भुईमूग, सोयाबीनसह कडधान्य पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. हे संकट कमी म्हणून की काय कळपाने फिरणारी वानरे व रानडुकरे हातातोंडाशी आलेली पिके फस्त करत असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. 

जून व जुलै महिन्यात पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली होती. पाऊस नसल्यामुळे या वेळी पाणी विकत घेऊन शेतकऱ्यांना भात लागण उरकावी लागली. मात्र, उसंत घेतलेल्या पावसाने ऑगस्टमध्ये कमबॅक केले. मात्र, सततच्या पावसाने घेवडा, बटाटा, भुईमूग, सोयाबीन ही पिके तसेच कडधान्याची पिकेही शेतात पाणी साचून राहिल्याने कुजली आहेत. पावसाचा फटका भातशेतीलाही बसणार असून त्यामुळे उत्पन्नात घट येण्याची भीती आहे. 

संततधार पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान होत असताना उभ्या पिकांना रानडुकरे व वानर लक्ष्य करत आहेत. शेतातील उभी पिके कळपाने फिरणारी वानरे, रानडुकरे फस्त करत आहेत. पिके मातीमोल होत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. पावसामुळे स्ट्रॉबेरीचे नुकसान झाले आहे. गेल्या वर्षीही स्ट्रॉबेरी उत्पादकांना पावसाने नुकसान सहन करावे लागले होते. एकूणच भातासह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेती उत्पन्नात मोठी घट होण्याची भीती आहे. संबंधित विभागाने नुकसानीची तातडीने पाहणी करून पंचनामा करावा, अशी मागणी केळघर सोसायटीचे अध्यक्ष बबनराव बेलोशे, संचालक राघव बिरामणे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे. 

संपादन ः संजय साळुंखे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saurabh Das Contempt Case : 'सीजेपी'चे प्रवक्ते सौरभ दास पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! मानहानी आणि कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी वाढला न्यायालयीन फेरा, काय आहे प्रकरण?

Rohit Sharma on 2027 WC: निवृत्तीची चर्चा सुरूच होती, त्यात रोहित शर्माने २०२७ च्या वर्ल्ड कपबाबत केलं मोठं विधान; चाहत्यांना टेंशन

'जुळून येती रेशीमगाठी' मालिका ८० च्या दशकात असती तर कसे दिसले असते आदित्य- मेघना? AI ने बनवले कमाल फोटो

Khade Hanuman: नव्या जागेवर मंदिर तयार पण हनुमानजी जागचे हलेनात; उज्जैनमध्ये दक्षिणमुखी अन् उत्तरमुखी समस्या काय आहे?

Marathi News Live Updates : नेपाळमधील महाप्रलयात आतापर्यंत 1,377 जणांचा मृत्यू; 5,130 नागरिक अजूनही बेपत्ता

SCROLL FOR NEXT