Mahesh Shinde esakal
सातारा

सातारा : कामगार नेताच खंडणी बहाद्दर; महेश शिंदे

आमदार महेश शिंदे उद्योजकांना ताकद देणार

सकाळ वृत्तसेवा

सातारा : सातारा औद्योगिक वसाहतीमधील (एमआयडीसी) खरे खंडणी बहाद्दर येथील माजी आमदार व माजी जलसंपदामंत्री आहेत. माथाडींच्या नावाखाली उद्योजकांना धमकावून खंडणी वसूल केली जात आहे. हे प्रकार थांबवावेत, असा इशारा आमदार महेश शिंदे यांनी आज आमदार शशिकांत शिंदे यांना नाव न घेता दिला.

राज्यातील सत्त्ता नाट्यावर पडदा पडल्यानंतर महेश शिंदे हे सातारा येथे पत्रकारांशी व कोरेगावात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना बोलत होते. खंडणीबद्दल साताऱ्याच्या गादीला बदनाम करणाऱ्यांना काही तरी वाटली पाहिजे. त्यांनी साताऱ्याची एक एकर जमीन काढली, तरी तुमची ‘बारामती’ ते विकत घेऊ शकतात. त्यांच्यात देण्याची दानत आहे. असे घेण्याची, लुबडण्याची नाही, हे लक्षात घ्या. आता असे प्रयत्न तातडीने थांबवण्याचा इशाराही त्यांनी दिला. आम्ही उद्योजकांना ताकद देऊन नवीन उद्योगधंदे वाढवू. उद्योजकांना जर तुम्ही पैसे काढण्याचे ठिकाण समजत असाल, तर महेश शिंदे इथून पुढे तुम्हाला शंभर टक्के आडवा असेल, असा इशाराही त्यांनी आमदार शशिकांत शिंदेंचा नामोल्लेख टाळून दिला.

आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत. त्यामुळे आम्ही जरूर बंड केले. मात्र, ते आमच्यावर दोन वर्षे झालेल्या अन्यायाविरुद्ध केले. बारामतीच्या चुकीचे वागणाऱ्या पाटलाविरुद्ध केले आणि करेक्ट कार्यक्रम यशस्वी केला, असे सांगून आमदार महेश शिंदे म्हणाले, ‘‘आम्हाला कोरेगावचा जरंडेश्वर साखर कारखानाही वाचावायचा आहे. नुसता वाचवायचा नाही तर तो २५ हजार सभासदांच्या मालकीचा करायचा आहे. आता सिंचन योजनेच्या उद्‍घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार,

माझी अजित पवार यांना विनंती आहे. तुम्ही बारामतीला किती निधी दिला, ते जाहीर करावं. राज्याचा मंत्री किंवा अर्थमंत्री बायस नसला पाहिजे. तुम्ही जर दुजाभाव करायला लागला, तर शंभर टक्के तुम्ही अर्थमंत्री व्हायच्या लायकीचे नव्हता.

- महेश शिंदे, आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

Katraj Issues : सोपानकाकानगरमध्ये नागरी सुविधांचा अभाव, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी; तीन वर्षांपासून करत भरुनही महापालिकेचे दुर्लक्ष

Agriculture News : ऊस पिकावर हुमणीच्या प्रादुर्भावाचा धोका; कृषी विभागातर्फे प्रभावी उपाययोजना करण्याचे आवाहन

Women Empowerment: घरच नव्हे, गावही चालविणार! छप्पन्न गावांत लवकरच महिलाराज, १११ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

SCROLL FOR NEXT