shashikant shinde and udayanraje bhosale sakal
सातारा

Satara News : शशिकांत शिंदेंचा खासदार उदयनराजेंवर पलटवार; निवडणुकीत रडीचा डाव न खेळण्याचा सल्ला

लोकशाहीच्या माध्यमातुन निवडणुकीला सामोरे जावे. रडीचा डाव खेळु नये. खोट्या केसेस दाखल करुन राजकारणात कोणाचा आवाज दाबणे याला लोकशाही म्हणत नाहीत.

हेमंत पवार

कऱ्हाड - निवडणुकीसाठी मी कोणाचे आव्हाण समजत नाही. माझी लढाई तत्वाची आहे. लोकशाहीच्या माध्यमातुन निवडणुकीला सामोरे जावे. रडीचा डाव खेळु नये. खोट्या केसेस दाखल करुन राजकारणात कोणाचा आवाज दाबणे याला लोकशाही म्हणत नाहीत.

खोट्या केसेस टाकुन दाबण्याचे प्रयत्न केला तरी सत्य मरत नसते. लोकांच्या न्यालायात जावुया. सर्व प्रकरणाचा उपयोग करुन राजकीय वापर करण्याचा प्रयत्न करत आहात की काय अशी शंका येते असा पलटवार महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर केला.

महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सातारा लोकसभेचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रथमच त्यांनी आज गुरुवारी कऱ्हाडचा दौरा केला.

त्यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आमदार बाळासाहेब पाटील, सत्यजितसिंह पाटणकर व पदाधिकारी उपस्थित होते. सातारा जिल्ह्याला कोणत्याही जातीयवादी पक्षाची दृष्ट लागु नये यासाठी यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराचे व्हीजन घेवुन पुढे जाणार आहे असे सांगुण आमदार शिंदे यांनी अभ्यासु लोकप्रतिनिधी म्हणुन, काम करणारा पदाधिकारी म्हणुन काम करणार आहे असे सांगितले.

खासदार उदयनराजे भोसेल यांचे समोर आव्हाण आहे. त्या प्रश्नावर आमदार शिंदे म्हणाले, मी कोणाचे आव्हाण समजत नाही. माझी लढाई कोणत्या उमेदवाराशी किंवा कोणत्या नावाशी नाही. माझी लढाई तत्वाची आहे. आम्ही आव्हाण समजतच नाही. अनेक वर्षापासुन सातारा जिल्ह्याला तोडण्याचा फोडण्याचा प्रयत्न झाला. मात्र त्यात यश आले नाही. आत्ताही पक्ष फोडुन हा जिल्हा काबीज करण्याचा प्रयत्न होतोय.

मात्र त्याला लोकांतुन प्रतिसाद मिळत नाही. आमच्याकडे सक्षम उमेदवार होते. उमेदवारीसाठी श्रीनिवास पाटील यांना विनंती केली होती. मात्र त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव असमर्थता व्यक्त केली. पक्षाकडुन मला लढावे लागेल असे सांगण्यात आले. त्यामुळे मी उमेदवार म्हणुन लढायला उभा राहिलो आहे.

खासदार भोसले यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदार संघात फिरणेही शक्य होणार नाही अशी टिका करुन काही प्रकरणे लवकरच पुढे येतील असा इशारा दिला होता. त्यावर ते म्हणाले, मी बारा महिने काम करतो. सातारा जिल्ह्यातील जमसामान्यात माझा संपर्क आहे. जे कोण म्हणत असतील त्यांचा निवडणुकीपुरताच संपर्क आहे का हे जनता ठरवेल.

लोकशाहीच्या माध्यमातुन निवडणुकीला सामोरे जावे. रडीचा डाव खेळु नये. खोट्या केसेस दाखल करुन राजकारणात कोणाचा आवाज दाबणे याला लोकशाही म्हणत नाहीत. आमची लढाई हुकुमशाही, अधिकाराचा वापर करुन लोकांना दबावाच्या राजकारणात ओढण्याचा प्रयत्न केला जातो त्याविरोधात आहे.

सातारा जिल्हा हा स्वाभिमानी आहे. आम्ही निष्ठावंत आहोत. खोट्या केसेस टाकुन दाबण्याचे प्रयत्न केला तरी सत्य मरत नसते. लोकांच्या न्यायालयात जावुया. सर्व प्रकरणाचा उपयोग करुन राजकीय वापर करण्याचा प्रयत्न करत आहात की काय अशी शंका येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT