Narendra Patil sakal
सातारा

Satara Loksaha Election : नरेंद्र पाटलांनी वाढवला साताऱ्यात महायुतीच्या उमेदवारीचा सस्पेन्स

सातारा लोकसभा निवडणुकीसाठी सध्या महायुतीकडून इच्छुक असणाऱ्या कोणालाही अद्यापही ग्रीन सिग्नल देण्यात आलेला नाही.

हेमंत पवार

सातारा - सातारा लोकसभा निवडणुकीसाठी सध्या महायुतीकडून इच्छुक असणाऱ्या कोणालाही अद्यापही ग्रीन सिग्नल देण्यात आलेला नाही. महायुतीची उमेदवारी आपल्याला मिळावी यासाठी खासदार उदयनराजे भोसले, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, पुरुषोत्तम जाधव अन्य काही जणांनी प्रयत्न सुरु केले आहेत.

मात्र सातारा लोकसभेचा उमेदवार मीच असणार असे स्पष्ट करुन खासदार भोसले यांनी मतदारसंघ पिंजुन काढण्यास सुरुवात केली आहे. असे असताना लोकसभा उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या नरेंद्र पाटील यांनीही मतदाराच्या भेटीगाठीसाठी पायाला भिंगरी लावली आहे. त्यांनी दोन आठवड्यापासुन संपर्क दौरा वाढवुन भेटीगाठीवर चांगलाच जोर दिला आहे.

त्याचबरोबर त्यांनी भाजपकडून अजुनही कोणाला सुचना मिळालेल्या नाहीत. त्यामुळे शेवटच्या टप्यात काय होईल हे सांगता येत नाही असे सुचक वक्तव्य केले आहे. त्यामुळे नक्की उमेदवार कोण? याचा सप्सेन्स आणखीच वाढला आहे.

सातारा लोकसभा मतदार संघातील उमेदवारीचे व्टिस्ट अजुनही सुटलेले नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अजित पवार यांनी ज्यांचा सिटींग खासदार त्यांचीच ती जागा हे सुत्र मांडले आहे. त्यामुळे सातारा लोकसभा मतदार संघाची जागा ही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराला मिळणार की तेथे भाजपकडुन खासदार उदयनराजे भोसले हे उभे राहणार याबाबत सध्या उलटसुलट चर्चा सुरु आहेत.

त्यातच खासदार भोसले यांनी उमेदवारीसाठी जोरदार लॉबींग करुन सातारा जिल्ह्यात भेटीगाठीवर भर दिला आहे. त्यामुळे त्यांनी वातावरण निर्मीतीही सुरु केली आहे. मध्यंतरी महायुतीच्या घटक पक्षांच्या झालेल्या मेळाव्यात नरेंद्र पाटील यांनी जाहीर मेळाव्यात आपल्या भाषणातुन लोकसभा निवडणुकीसाठी मलाही संधी मिळणार आहे. मी अजुनही महाराज साहेब अपेक्षीत असल्याचे जाहीरपणे सांगतो. आमचे दिल्लीला कोणीच नाही.

तुम्ही दहा वर्षे लोकसभेचे नेतृत्व केले आहे. राज्यसभेचेही तुम्ही नेतृत्व करत आहात. तुम्ही जसे दिल्लीला गेलात तसे आमचे मात्र दिल्ली कोणीही नाही. आम्ही सागर बंगला आणि भाजपचे मुंबईचे कार्यालय यांच्याच संपर्कात आहोत. मला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळ दिला. त्याव्दारे मला काय सांगायचे ते मी सांगीतले आहे, असे सांगुन उमेदवारीचा ससपेन्स वाढवला होता.

दरम्यान सातारा लोकसभेचा उमेदवार मीच असणार असे स्पष्ट करुन खासदार भोसले यांनी गेल्या काही महिन्यापासून मतदारसंघ पिंजुन काढण्यास सुरुवात केली आहे. असे असताना उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या नरेंद्र पाटील यांनीही मतदारांच्या भेटीगाठीसाठी पायाला भिंगरी लावली आहे. त्यांनी दोन आठवड्यापासुन संपर्क दौरा करुन भेटीगाठीवर जोर दिला आहे.

त्यांना अजुनही उमेदवारी मिळेल अशी आशा आहे. त्यातच त्यांनी पत्रकांरांशी बोलताना भाजपकडून अजुनही कोणाला सुचना मिळालेल्या नाहीत. त्यामुळे शेवटच्या टप्यात काय होईल हे सांगता येत नाही असे सुचक वक्तव्य केले आहे. त्यामुळे नक्की उमेदवार कोण? याचा सप्सेन्स आणखीच वाढला आहे.

पक्ष सातारकरांचा कौल घेवुन उमेदवारी देईल

भारतीय जनता पक्षातुन खासदार उदयनराजे भोसले, मी, धैर्यशील कदम आणि अजुनही अनेक उमेदवार अपेक्षीत आहेत. मला विश्वास आहे की सातारकरांचा कौल घेवुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यंत्री देवेद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिघे एक चांगला उमेदवार देण्याचा निर्णय घेतील.

त्यांच्याकडून लवकरात लवकर उमेदवारी जाहीर होईल मात्र उमेदवार कोणीही असु शकतो, अशीही आशा नरेंद्र पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली आहे. त्यामुळे पक्ष सातारकरांचा कौल घेवुन उमेदवारीचा काय निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohammed Shami: ३ सामन्यात १५ विकेट्स... शमीचा परफॉर्मन्स जबर, तरी संघाबाहेर! आगरकर-गंभीर वादामुळे ‘क्लीन बोल्ड’?

Indurikar Maharaj daughter engagement : निवृत्ती महाराज इंदुरीकरांकडून लेकीच्या साखरपुड्यात लाखोंचा खर्च? ; डबेवाला संघटना अध्यक्षांची जोरदार टीका, म्हणाले...

Sand Mafia Caught : महसूल विभागाचा वाळू माफीयांना दणका : संयुक्त कारवाईत अवैध वाळू उपसा करणाऱ्या दोन बोटी उडवल्या!

'लागली पैज?' नाटक येतंय प्रेक्षकांच्या भेटीला; 'शुभविवाह' फेम अभिनेता साकारतोय मुख्य भूमिका; रुमानी खरेचं रंगभूमीवर पदार्पण

Baramati Nagar Parishad Election : बारामतीत जय पवार यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्याची मागणी......

SCROLL FOR NEXT