Mahinda dam
Mahinda dam sakal
सातारा

सातारा : महिंद धरण भरले; लाभक्षेत्र सुखावले

सकाळ वृत्तसेवा

ढेबेवाडी : पावसाने जोर धरल्याने ढेबेवाडी विभागातील वांग नदीवरील महिंद धरण आज (बुधवारी) सकाळी ओव्हर फ्लो झाले. धरणाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असून धरणाच्या लाभक्षेत्राची उन्हाळभराची चिंता मिटल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.

दरम्यान, धरणक्षेत्रात कुणी पोहताना, सेल्फी काढताना किंवा जीव धोक्यात घालून हिंडताना आढळल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष पवार यांनी सांगितले.

ढेबेवाडी विभागातील खरिपाच्या पेरण्या उरकल्या असून पीक उगवणही चांगली आहे. लवकरच भात रोपे लावणीलाही शेतकरी प्रारंभ करतील. गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने दोन दिवसांपासून चांगलाच जोर धरल्याने शेतकरी सुखावला आहे. ढेबेवाडीपासून सुमारे दहा किलोमीटरवरील वांग नदीवरील महिंद धरण आज पूर्ण क्षमतेने भरले. सकाळपासून धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहत आहे. महिंद धरणाला चांगली नैसर्गिक अनुकूलता लाभली आहे. डोंगरातून नदी, नाले व ओढ्यातून मोठ्या प्रमाणात वाहून येणाऱ्या पाण्यामुळे पावसाळ्याच्या सुरवातीच्या टप्प्यातच धरण ओव्हर फ्लो होते. ढेबेवाडी खोऱ्यातील अनेक गावांच्या शेती व पिण्याच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न या धरणामुळे सुटला असून पावसाळ्यात ८५ दशलक्ष घनफूट क्षमतेचे महिंद धरण भरतेय कधी, याकडेच येथील जनतेचे लक्ष लागलेले असते.

जॅकेटिंगमुळेच बचावलेय महिंद धरण...

महिंद धरणाच्या १०४ मीटरच्या मुक्तपतन पद्धतीच्या सांडव्यावरून पाणी ओसंडून वाहत आहे. मध्यंतरी धरणाच्या दगडी सांडव्याची पडझड झाल्याने धरणाला मोठा धोका निर्माण झालेला होता. मात्र, जॅकेटिंग केल्याने तो हटला. अत्यंत आव्हानात्मक स्थितीत तत्कालीन अधीक्षक अभियंता विजय घोगरे, तत्कालीन कार्यकारी अभियंता सुरेन हिरे, संजय बोडके व त्यांचे सहकारी उत्तमराव दाभाडे, योगेश पाडळकर आदींनी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक महेश पाटील यांच्या विशेष सहकार्याने हे काम अवघ्या २५ दिवसांत तडीला नेत धरणाला सुरक्षितता दिली होती. आज हे धरण भरल्यानंतर या जुन्या आठवणींनाही धरणस्थळी उपस्थितांनी उजाळा दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मतदानात महाराष्ट्र तळाला, आतापर्यंत झालेल्या मतदानात 'हा' मतदारसंघ आघाडीवर

Navi Mumbai News: 13 वर्षाच्या मुलाने पॉर्न पाहून अल्पवयीन बहिणीला केलं गरोदर, पनवेलमधील धक्कादायक घटना

Latest Marathi Live News Update: नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडून मतदान केंद्रांच्या सुरक्षेचा आढावा

T20 WC 2024 पूर्वी संघाने बदलला कर्णधार; 'या' स्टार खेळाडूकडे दिली टीमची कमांड

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

SCROLL FOR NEXT