debhewadi cremation  system
सातारा

दरराेज त्यांना खांद्यावरून न्यावा लागताेय बाधितांचा मृतदेह

येथील कोविड स्मशानभूमीची स्थिती "आओ जाओ घर तुम्हारा' अशीच झालेली आहे. अंत्यसंस्कारानंतर सॅनिटायझरची फवारणी नाही. स्मशानभूमीकडे जाण्यास कुणाला मज्जाव नाही. एवढंच नव्हे तर त्याच परिसरात रक्षाविसर्जनासह अन्य विधीही होत असल्याने सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनण्याची भीती आहे.

राजेश पाटील

ढेबेवाडी (जि. सातारा) : येथील कोविड स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता जोरदार पावसामुळे वाहून गेल्याने ऍम्ब्युलन्स स्मशानभूमीपर्यंत नेण्याचा मार्ग बंद झाला आहे. अक्षरशः कसरत करतच मृतदेह उचलून नेण्याची वेळ यंत्रणेवर आली आहे.

येथील वांग नदीवरील पुलानजीक कोविड स्मशानभूमी आहे. येथील तसेच बाहेर गावच्या रुग्णालयात मृत्यू होणाऱ्या विभागातील बाधित रुग्णांवर अंत्यसंस्कारासाठी त्याचा वापर करण्यात येत आहे. स्मशानभूमीपर्यंत ऍम्ब्युलन्स नेण्यायोग्य रस्ता नसल्याने सुरवातीला येथील मृतावर पाटणला अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली होती. त्यानंतर जेसीबीच्या साह्याने तातडीने रस्ता तयार करण्यात आला. परंतु, जोरदार पावसामुळे पाण्याच्या लोटाबरोबर तो वाहून गेल्याने पुन्हा तेथे कसरत सुरू झाली आहे.

ऍम्ब्युलन्स स्मशानशेडपर्यंत पोचू शकत नसल्याने अक्षरशः मृतदेह उचलून नेण्याची वेळ संबंधित कर्मचाऱ्यांवर आली आहे. आज सकाळीही तेथे पीपीई किट घातलेले दोन कर्मचारी खांद्यावरून मृतदेह घेऊन जाताना दिसून आले. रस्त्याच्या पलीकडच्या बाजूच्या नाल्याचे पाणी मोठ्या पाइपने स्मशानभूमीच्या रस्त्याकडे वळविल्याने रस्ता तुटत आहे. यावर तातडीने उपाय शोधण्याची गरज असल्याचे सरपंच आत्माराम पाचुपते यांनी सांगितले.

वर्दळ अन्‌ विधीही सुरूच

येथील कोविड स्मशानभूमीची स्थिती "आओ जाओ घर तुम्हारा' अशीच झालेली आहे. अंत्यसंस्कारानंतर सॅनिटायझरची फवारणी नाही. स्मशानभूमीकडे जाण्यास कुणाला मज्जाव नाही. एवढंच नव्हे तर त्याच परिसरात रक्षाविसर्जनासह अन्य विधीही होत असल्याने सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनण्याची भीती आहे. येथील सहायक पोलिस निरीक्षक संतोष पवार यांनी तेथे भेट देऊन स्मशानभूमीकडे जाणारे रस्ते बॅरिकेट्‌सने बंद करून ठिकठिकाणी फलक लावण्याच्या सूचना केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विधानसभेत मराठीची अब्रू गेली, राज ठाकरेंचा नार्वेकरांवर हल्लाबोल, सत्ताधाऱ्यांची पोलखोल! म्हणाले, मराठी माणसाने विचार करावा ... VIDEO

तृणमूलच्या महिला नेत्याच्या घरी छापा, ३०० तोळे सोन्याचं घबाड; अधिकारी चक्रावले

Sindhudurg Rain Update : 'एल निनो'च्या चिंतेला तूर्त ब्रेक!...अखेर सिंधुदुर्गात मॉन्सून सक्रिय; 30 जूनपर्यंत धो-धो बरसणार, हवामान विभागाचा अंदाज

IPL 2027 Trade: आयपीएल इतिहासातील High-Profile डिल! रिषभ पंत १२ कोटींचा तोटा सहन करून 'या' संघाच्या ताफ्यात, कुलदीप यादव LSG कडे

MSRTC Employees DA Hike : एसटी महामंडळाच्या ८६ हजार कर्मचाऱ्यांना दिलासा, महागाई भत्ता ५८ टक्क्यांपर्यंत वाढवला; मंत्री सरनाईकांची माहिती

SCROLL FOR NEXT