Asha Workers Association esakal
सातारा

साताऱ्यात १८ आशा सेविकांवर गुन्‍हा दाखल

गिरीश चव्हाण

सातारा : जिल्‍हाधिकाऱ्यांनी दिलेल्‍या आदेशाचा भंग करत येथील जिल्‍हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन केल्‍याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्‍यात आशा सेविका (asha worker) संघटनेच्‍या पदाधिकाऱ्यांसह १८ जणांवर गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे. त्याची फिर्याद हवालदार श्रध्‍दा पवार यांनी नोंदविली आहे. (satara-marathi-news-police-registered-case-against-asha-worker)


प्रलंबित मागण्‍यांकडे शासनाचे लक्ष वेधण्‍यासाठी आशा सेविकांनी जिल्‍हा परिषदेसमोर आंदोलनाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोर्चा संयोजकांना जिल्‍हाधिकाऱ्यांच्या आदेशाची माहिती देत आंदोलन स्‍थगित करण्‍याची सूचना केली होती. पोलिसांनी केलेल्‍या सूचनेकडे दुर्लक्ष करत या आंदोलनासाठी नुकतीच जिल्‍हा परिषदेच्‍या मैदानावर मोठा जमाव जमला होता.

याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्‍यात आनंदी माणिक अवघडे, माणिक विष्‍णू अवघडे (रा. सदरबझार, सातारा), स्‍वाती जगन्नाथ भिवरकर (रा. अलगुडेवाडी, फलटण), पल्‍लवी गणपत नलवडे (रा. आळजापूर, फलटण ), जयश्री बाळासाहेब काळभोर (रा. पाल, ता. कऱ्हाड), सविता राजेंद्र थोरात (रा. ओंड, ता. कऱ्हाड), सावित्रा भीमराव भोसले (रा. शिवाजीनगर, खंडाळा), लक्ष्‍मी अजित दुदुस्‍कर (रा. दुदुस्‍करवाडी, ता. जावळी) यांच्‍यासह आठ जणांवर गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे. या आंदोलनात सहभागी झालेल्‍या इतर आशा सेविकांची माहितीही पोलिसांकडून संकलित करण्‍यात येत आहे. हवालदार पोळ तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Income Tax: नवीन कर प्रणालीचे 5 मोठे फायदे! कमी कर भरायचा असेल तर एकदा नक्की वाचा

Madhuri Dixit Viral: काशीत माधुरीचा ‘शिव तांडव’ व्हायरल; पतीसोबत गंगेत क्रूझ सवारी आणि बाबा विश्वनाथचे घेतले दर्शन

IPL 2026 CSK vs RR : वैभव सूर्यवंशी आज पार करणार 300 धावांचा टप्पा? CSK विरुद्ध कसं राहिलंय प्रदर्शन?

Latest Marathi News Live Update : पार्थ पवार आणि राज ठाकरे यांच्यात दीड तास चर्चा

PSL Controversy: PSLमध्ये मोठा ड्रामा! फखर जमानकडून 'बॉल टॅम्परिंग'? पीसीबीने हायलाईट्समधून पुरावेच हटवले

SCROLL FOR NEXT