सातारा

सरपंचपदासाठी 12 पैकी 11 गावांत अनुसूचित जातीचा सदस्यच नाही; बहुजनवादी संघटना आक्रमक

केराप्पा काळेल

कुकुडवाड (जि. सातारा) : माण तालुक्‍यातील सरपंच आरक्षण सोडत रद्द करा, अशी मागणी बहुजनवादी संघटनांनी तहसीलदारांकडे निवेदनाव्दारे केली आहे. तालुक्‍यासाठी झालेली सरपंच आरक्षण सोडत दोषपूर्ण आणि अनुसूचित जाती प्रवर्गावर अन्याय करणारी आहे. झालेल्या सोडतीनुसार अनुसूचित जाती खुला प्रवर्गसाठी महिमानगड, हस्तनपूर, वारुगड, धामणी, बोडके, पांढरवाडी या ठिकाणी, तर अनुसूचित जाती महिला प्रवर्गसाठी पिंगळी बुद्रुक, परकंदी, खडकी, बोथे, कुरणेवाडी व भाटकी येथील सरपंचपदे आरक्षित करण्यात आली आहेत. 

मात्र, 12 या गावांपैकी 11 गावांत अनुसूचित जातीचा सदस्यच नाही. पिंगळी बुद्रुक येथे अनुसूचित जाती संवर्गातील पुरुष सदस्य आहे. मात्र, तेथे अनुसूचित जाती स्त्री प्रवर्गाचे आरक्षण टाकले आहे. परिणामी या 12 गावांत अनुसूचित जाती प्रवर्गातील सदस्यच नाहीत. त्यामुळे ही 12 पदे रिक्त राहणार आहेत. सरपंच निवडीवेळी आरक्षित प्रवर्गातील सदस्य उपलब्ध झाला नाही तर आरक्षण बदलले जाऊ शकते. यामुळे संबंधित गावांचा प्रश्न सुटेल. परंतु, अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी आरक्षित 12 पैकी 12 जागा रिक्त राहिल्यास अनुसूचित जातींवर अन्याय करणारी घटना आहे. 

ही सोडत रद्द करावी, अन्यथा बहुजनवादी संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही संघटनांनी दिला आहे. या निवेदनावर माजी सभापती बाळासाहेब रणपिसे, युवराज भोसले, प्रमोद लोखंडे आदींच्या सह्या आहेत. 

पोलिस ठाण्याच्या टॉवरवर चढून युवकाचे शोले स्टाइल आंदोलन; न्याय मिळत नसल्याने संताप

शिवसैनिकांची अभेद्य फळी आणखी मजबूत करणार; बनपुरीत शेलारांची ग्वाही

सरकारी कर्मचाऱ्यांनाे! BSNLने तुमच्यासाठी आणलीय खास याेजना


Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT