vijay wadettiwar system
सातारा

'ओबीसींत फूट पाडणाऱ्या न्या. रोहिणी आयोगास आमचा विरोधच'

श्री. माळी यांनी सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील इतर पक्षातील अनेक बडे नेते कॉंग्रेसच्या संपर्कात असून, ते लवकरच कॉंग्रेस प्रवेश करतील, असे सांगितले.

हेमंत पवार

श्री. माळी यांनी सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील इतर पक्षातील अनेक बडे नेते कॉंग्रेसच्या संपर्कात असून, ते लवकरच कॉंग्रेस प्रवेश करतील, असे सांगितले.

कऱ्हाड : ओबीसींना ताकद देऊन ओबीसी समाजाच्या obc community सर्व समस्या सोडवणार आहे. तसेच ओबीसी महामंडळातील कर्जदारांवर अनधिकृत झालेले खटले काढून घेणार आहे. ओबीसी महामंडळाचे आर्थिक बजेट वाढवणार आहे. त्याचबरोबर बारा बलुतेदारांच्या प्रश्नासंदर्भात लवकरच मंत्रालयात प्रशासकीय बैठक लावणार आहे. ओबीसींमध्ये फूट पाडणाऱ्या न्या. रोहिणी आयोगास आमचा विरोध असेल. मराठा आरक्षणाला maratha reservation आमचा पाठिंबा असून, केंद्र सरकारने central government यावर लवकर तोडगा काढावा, असे प्रतिपादन भूकंप, मदत व पुनर्वसन तथा सामाजिक न्यायमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले. satara-marathi-news-vijay-wadettiwar-obc-reservation-maratha-reservation

मंत्री वडेट्टीवार यांनी महाराष्ट्र कॉंग्रेस समितीचे ओबीसी विभाग प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांच्या काले येथील निवासस्थानी नुकतीच सदिच्छा भेट दिली. त्यावेळी ते म्हणाले,"" भानुदास माळी यांच्या माध्यमातून कॉंग्रेस मजबूत करणार असून, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मी आणि भानुदास माळी आम्ही राज्यभर दौरा करणार आहे.''

श्री. माळी यांनी सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील इतर पक्षातील अनेक बडे नेते कॉंग्रेसच्या संपर्कात असून, ते लवकरच कॉंग्रेस प्रवेश करतील, असे सांगितले. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष इंद्रजित मोहिते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे स्वीय सहायक गजानन आवळकर, राष्ट्रीय युवक कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती महादेवराव देसाई, श्री. खरमाटे, बाळासाहेब सानप, लक्ष्मण हाके, बाळनाना जाधव, दादा मंडले, आनंदराव सावंत, संतोष सूर्यवंशी, नंदकुमार कुंभार, संजय तडाखे, बनवडी गावचे सरपंच प्रदीप पाटील, संपतराव माळी, अशोक माळी, माळी महासंघाचे चिटणीस उत्तम माळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT