patan 
सातारा

भातलावणीच्या "या' पद्धतीतून मिळते भरघाेस उत्पन्न

जयभीम कांबळे

तळमावले (जि. सातारा) ः सध्या या भागात भातलावणीचे काम युद्धपातळीवर सुरू असून, काही ठिकाणी ते अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे शिवार शेतकरी व मजुरांनी गजबजून गेले आहे. 

धुळवाफेवरील भातपेरणी ते भातलावणी असा काहीसा क्रम काळगाव विभागातील पेरणीमध्ये येतो. काळगाव खोऱ्यात भात हे पीक प्रामुख्याने घेतले जाते. कमी पाण्यावरील व जास्त पाण्यावरील भाताची विविध पिके घेतली जातात. 


प्रतिवर्षी या विभागातील मुंबई-पुणे व अन्य ठिकाणी नोकरीस असलेला चाकरमानी या कामासाठी हमखास हजर राहतो; परंतु यंदा लॉकडाउनमुळे हा चाकरमानी शेतीच्या मशागतीच्या कामापासूनच शेतामध्ये व्यस्त आहे. जास्तीतजास्त वेळ शेतीमध्ये देण्याचा प्रयत्न या लोकांचा दिसून येतो. यंदा आतापर्यंत पावसाने चांगली साथ दिल्यामुळे शेतकरी राजा सुखावला आहे. 

निवी, कसणी व परिसरामध्ये नाचणीचे पीकही घेतले जाते. भात लावणीनंतर पेरणी करण्याचा हंगाम संपतो. सध्या सर्वच शिवारात भात लावणीची कामे जोमाने सुरू आहेत. पेरणीचा शेवटचा टप्पा पार करण्यात सर्व जण व्यस्त दिसत आहेत. 


भातलावणीच्या पद्धतीस आमच्याकडे रोपा लावणे असे म्हटले जाते. प्रचंड मेहनत करावी लागणारी ही प्रक्रिया आहे; परंतु या पद्धतीमुळे भाताचे उत्पन्न चांगले मिळते, त्यामुळे आम्ही ही पद्धत वापरतो. 

- राजाराम डाकवे, शेतकरी 

(संपादन ः संजय साळुंखे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: चीनमध्ये उतरताच डोनाल्ड ट्रम्प यांचा अपमान! स्वागतासाठी शी जिनपिंग गैरहजर; ड्रॅगनकडून अमेरिका-चीन संबंधांबाबत नवा संकेत?

Prateek Yadav: प्रतीक यादवच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला पल्मोनरी थ्रोम्बोएम्बोलिझम काय? डॉक्टरला बोलावण्याचीही संधी मिळाली नाही...

RCB VS KKR LIVE: अजिंक्य रहाणेने वर्ध्याच्या पोट्ट्याला दिली पदार्पणाची कॅप... जाणून घ्या कोण आहे सौरभ दुबे? ६ फूट ५ इंच उंचीचा गोलंदाज

"नजरेत धग अन् रग..."ओळखलंत का 'रंगी'ला? १९ जूनला होतंय 'घबाडकुंड'चं दर्शन!

Pune News : थकबाकी न भरल्यास पथारी व्यावसायिक काळ्या यादीत; प्रशासनाचा इशारा

SCROLL FOR NEXT