Satara Municipality
Satara Municipality  sakal
सातारा

सातारा : महिला उमेदवारांसाठी दोन्ही आघाड्यांचा कस

सकाळ वृत्तसेवा

सातारा : सातारा पालिका निवडणुकीच्या आरक्षण सोडतीत बहुतांश हेवीवेट ओबीसी नेत्‍यांचे प्रभाग खुले झाले आहेत. त्‍यामुळे त्‍यांना आता खुल्‍या प्रवर्गातून शड्डू ठोकावा लागणार आहे. माजी नगरसेवक बाळासाहेब खंदारे यांचा प्रभाग अनुसूचित जातीच्‍या महिलेसाठी राखीव झाल्‍याने त्‍यांनाही खुल्‍यातच लढत द्यावी लागणार आहे. माजी नगराध्‍यक्ष निशांत पाटील यांचा हक्काचा प्रभाग महिला राखीव झाल्‍यामुळे त्‍यांनाही दुसरा पर्याय निवडावा लागणार आहे. निवडणुकीत सर्वच प्रवर्गातील महिला उमेदवारांची निवड करताना दोन्‍ही आघाड्यांचा कस लागणार आहे.

सातारा पालिकेच्‍या २५ प्रभागांची आरक्षण सोडत आज जाहीर झाली. यानुसार पन्नासपैकी अनुसूचित जमातीच्‍या महिलेसाठी १, अनुसूचित जातीच्‍या महिलांसाठी व पुरुषांसाठी प्रत्‍येकी ३, तर खुल्‍या गटातील महिलांसाठी २१ आणि २२ जागा सर्वांसाठी खुल्‍या राहिल्‍या आहेत. सातारा पालिकेच्‍या राजकारणात ओबीसी व इतर मागास प्रवर्गातील नेत्‍यांचे नेहमी वर्चस्‍व राहिले आहे. यावेळी पहिल्‍यांदा इतर मागास आरक्षणाशिवाय पालिकेची निवडणूक होत आहे. त्‍यामुळे या नेत्‍यांचे हक्काचे प्रभाग राहिलेले नाहीत. त्‍यामध्‍ये माजी नगराध्‍यक्ष अशोक मोने, माजी उपनगराध्‍यक्ष ॲड. दत्ता बनकर, राजू भोसले, मनोज शेंडे, रवी ढोणे, सीता हादगे यांचा प्रामुख्‍याने सहभाग आहे. या सर्वांनी आजवरच्‍या पालिकेच्‍या निवडणुकांमध्ये आपापले वर्चस्‍व दाखवून दिले आहे; परंतु यांचे प्रभाग खुले झाल्‍याने या नेत्‍यांना आता खुल्‍या प्रवर्गातून उमेदवारी मिळविण्‍यासाठी नेत्‍यांची मर्जी संपादन करावी लागणार आहे. त्‍यासाठी त्‍यांना त्‍या त्‍या प्रभागातून खुल्‍या गटातील कार्यकर्त्यांबरोबर उमेदवारी मिळवण्‍यासाठी स्‍पर्धा करावी लागणार आहे.

प्रभाग क्रमांक १३ मधील एक जागा अनुसूचित जातीच्‍या महिलेसाठी, तर एक जागा खुल्या गटासाठी आरक्षित झाली आहे. या परिसरात सध्‍या बाळासाहेब खंदारे प्रतिनिधित्व करत होते. महिला आरक्षणामुळे त्‍यांची गोची झाली आहे. त्‍यामुळे त्‍यांना खुल्‍या गटातून लढत देण्‍याचाच पर्याय शिल्‍लक राहिला आहे. माजी नगराध्‍यक्ष निशांत पाटील यांचा बहुतांश भाग असणाऱ्या प्रभाग क्रमांक ३ मध्‍ये खुल्‍या गटातील महिलेचे आरक्षण जाहीर झाले आहे. त्‍यामुळे त्‍यांना प्रभाग क्रमांक ४ चा आसरा घ्‍यावा लागू शकतो. हद्दवाढीनंतर तयार झालेल्‍या प्रभाग क्रमांक १ मधून शंकर किर्दत, महेश मोहिते, सुधाकर यादव,

सक्षम महिलांनाच उमेदवारी

पहिल्‍यांदाच निवडणुकीत खुल्‍या गटातील महिलांसाठी २१ जागा राखीव झाल्‍या आहेत. यामुळे या जागांवर खुल्‍या गटातील सक्षम महिलेची उमेदवारी जाहीर करताना सातारा विकास आघाडी आणि नगर विकास आघाडीच्‍या नेत्‍यांना, तसेच पदाधिकाऱ्यांना कसरत करावी लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT