पथविक्रेते 
सातारा

पालिका, नगरपंचायतींसाठी महत्त्वाचे : पथविक्रेता समित्या करणे अनिवार्य

सचिन शिंदे

कऱ्हाड (जि. सातारा) : सातारा जिल्ह्याचा विचार करता, बहुतांश पालिकांमध्ये नगरपथ समित्याच नाहीत. ज्या पालिकांमध्ये अशा समित्या आहेत, त्या केवळ कागदावरच. त्यामुळे जिल्ह्यातील पालिकांना प्रत्यक्षात त्या समित्यांची जबाबदारी देवून त्या कार्यान्वीत करण्याचे आव्हान आहे. परिणामी प्रत्येक पालिकेत 18 सदस्यांची नगरपथ विक्रेता समितीची स्थापना करावीच लागणार आहे. 

लॉकडाउनमुळे शहरी भागातील फेरीवाल्यांसह पथविक्रेत्यांवर आलेल्या उपासमारीची वेळ सावरण्यासाठी व त्यांची आर्थिक स्थिती सदृढ करण्यासाठी पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेतून प्रत्येक फेरीवाल्याला 10 हजारांचे भांडवली कर्ज पुरविले जाणार आहे. केंद्र सरकारची आत्मनिर्भर योजना राज्य शासनातर्फे राबविली जाणार आहे. त्यामध्ये महापालिका, नगरपालिका व नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रात ती योजना प्रत्यक्ष कार्यान्वित होणार आहे. त्यासाठी नगरपथ विक्रेता समितीची स्थापना महत्त्वाची आहे. त्याबाबत नगर विकास खात्याने नुकताच आदेश काढला आहे. 

पालिकांचे मुख्याधिकारी त्या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतील. त्या समितीत लोकप्रतिनिधी, पोलिस, पथविक्रेता संघटना, व्यापारी संघटना, पथविक्रेत्यांचे प्रतिनिधी आणि उर्वरीत नामांकीत समाजसेवी किंवा स्वंयसेवी संस्थाच्या प्रतिनिधींचा समावेश असेल. 
पालिकांनी पुढाकार घेवून नगरपथ विक्रेता समितीच्या सदस्यांसमवेत पदाधिकारी, अधिकारी व हातगाडेधारकांना कर्ज देणाऱ्या आर्थिक संस्था, कर्ज पुरविणारे बचत गटांच्या प्रतिनिधींची बैठक घ्यावी, असेही नगर विकास विभागाने सुचीत केले आहे. 

कॉमन इंटरेस्ट गटही हवेत 
हातगाडेधारकांना कर्ज मिळवून देण्याची जबाबदारी पालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांवर राहणार आहे. त्याशिवाय कोणतीही व्यक्तीगत गट करणारी आर्थिक संस्था पात्र विक्रेत्यांचे संयुक्त उत्तरदायित्व घेऊ शकते. त्यासाठी काही ठिकाणी पथ विक्रेत्यांचे कॉमन इंटरेस्ट गट तयार केले आहेत. त्यांनाही पत पुरवठा करण्याचे आदेश आहेत. ज्या पालिकांमध्ये विक्रेत्यांचे कॉमन इंटरेस्ट गट नाहीत त्यांनाही तसे गट तयार करण्याचे नगरविकास विभागाने सुचीत केले आहे. पात्र विक्रेत्यांची यादी तयार करून ती यादी आर्थिक संस्थांना देण्यात यावी, गट स्वरूपात किंवा व्यक्तीगत कर्जाची मागणी असेल तरीही ती पूर्ण करण्यात येवून त्या संबधितांना कर्ज उपलब्ध करून द्यायचे आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SAW vs BANW Live: दक्षिण आफ्रिकेने बाजी मारली! भारताला स्पर्धेबाहेर फेकले? हरमनप्रीत कौरच्या संघाला एकच गोष्ट वाचवू शकते

CISF Bus Accident: कटरामध्ये CISF जवानांच्या बसला भीषण अपघात; ९ जण जखमी, तिघांची प्रकृती गंभीर, कशी घडली घटना?

Helicopter Crash: आक्रोश, धूर आणि मृत्यू... सौदी अरेबियात भीषण हेलिकॉप्टर दुर्घटना; अरामकोचे हेलिकॉप्टर कोसळून १४ जणांचा मृत्यू

Plane Crash : मोठी बातमी! फ्रान्समध्ये विमान कोसळलं, पाच विद्यार्थ्यांसह ११ जणांचा मृत्यू

IND vs IRE 2nd T20I : वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच... भारतीय संघात दोन खेळाडूंचे पदार्पण; कोण आहेत ते? जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन

SCROLL FOR NEXT