satara news  sakal
सातारा

Satara News : पृथ्वीराज चव्हाणांच्या मागणीनंतर नितीन गडकरींनी दिले 'हे' आदेश

त्यामुळे तेथील स्थानिक नागरिकांनी आमदार चव्हाण यांच्याकडे तेथे सेगमेंटल उड्डाण पूल बांधण्याची मागणी केली होती.

हेमंत पवार

उंब्रज - गावातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर सध्या भराव पूल असून त्याठिकाणी सेगमेंटल (पारदर्शक) उड्डाण पूल होणे अत्यावश्यक असल्याची मागणी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे उंब्रज परिसरातील नागरिकांनी केली होती.

त्यावरुन आमदार चव्हाण यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांना पत्र पाठवुन फोनवरून सेगमेंटल उड्डाण पूल होण्याची गरज सांगून चर्चा केली होती. त्यावरुन मंत्री गडकरी यांनी सेगमेंटल पुलाची व्यावहारिकता तपासून पुढील कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

कऱ्हाड व मलकापूर येथील जुना भराव उड्डाण पूल पाडून नवीन सेगमेंटल (पारदर्शक) उड्डाण पूल बांधण्याची प्रक्रिया आमदार चव्हाण यांच्या प्रयत्नातुन सुरु आहे. त्यासाठी जुना भराव उड्डाण पूल पाडला असून नवीन पूल बांधण्याचे काम सुरु आहे.

याच धर्तीवर उंब्रज येथील जुना भराव उड्डाण पुलामुळे उंब्रजचे दोन भाग झाले असून पुलाच्या बाजूला अरुंद सेवा रस्ता झाला असून येथे नित्याचीच वाहतूक कोंडी होत आहे. उंब्रज येथील बाजारपेठेचे नुकसान यामुळे होत आहे.

तसेच याच रस्त्यावर असलेला बस स्थानक वापरा अभावी पडून आहे. तेथील नागरिक बस साठी राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची वाट पहात उभे राहतात.

त्यामुळे अपघातांच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे तेथील स्थानिक नागरिकांनी आमदार चव्हाण यांच्याकडे तेथे सेगमेंटल उड्डाण पूल बांधण्याची मागणी केली होती. त्यावरुन आमदार चव्हाण यांनी मंत्री गडकरी यांना ई मेल द्वारे पत्र पाठवून फोनवरूनही त्यासंदर्भात चर्चा केली.

त्यानुसार मंत्री गडकरी यांनी आमदार चव्हाण यांच्या पत्राला उत्तर देत उंब्रज येथील पुलाची व्यवहारिकता तपासून योग्य ती कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT