Satara Latest Marathi News 
सातारा

चुकीच्या पद्धतीने वसुली केल्यास अधिकाऱ्यांना काळे फासू; 'बळीराजा'चा महावितरणला कडक इशारा

हेमंत पवार

कऱ्हाड (जि. सातारा) : वीज वसुली करताना कायदा व्यवहार यांची सांगड घाला. ज्या कुटुंबाकडे खरंच पैसे नाहीत त्या कुटुंबाकडे माणुसकीच्या नात्याने पाहा. ओगलेवाडी विभागाचे अधिकारी चुकीच्या पद्धतीने वीजबिल वसुली करणार असाल, तर बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने काळे फासून रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती जिल्हाध्यक्ष साजीद मुल्ला यांनी दिली. 

महावितरणकडून वीज वसुली जोरात चालू आहे, असे सांगून श्री. मुल्ला म्हणाले, ""बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने लॉकडाउन काळातील वीजबिलमाफी व नंतर वीजबिल वसुली असे दोन वेगवेगळे विधाने करणाऱ्या ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा निषेध करतो. त्यांच्या आदेशानुसार महावितरणचे अधिकारी घरगुती व शेतीपंपाची वीजबिल वसुली करत आहेत. 

त्यासाठी कनेक्‍शन कट करण्यास सुरुवात झाली आहे. ओगलेवाडी विभागाचे अधिकारी वीज कनेक्‍शन कट करत आहेत. अधिकारी तुम्ही जर हम करे सो कायदा या पद्धतीने वीजबिल वसुली करणार असाल, तर तुम्हाला बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने काळे फासू.'' 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon : दुचाकी, कार अन् बसचा भीषण अपघात, कारमधील ५ जणांसह ६ जणांचा मृत्यू, चिमुकला बचावला

Latest Marathi News Update : मंत्री नरहरी झिरवळ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या भेटीला

Nepal Banned India Mango : जपाननंतर नेपाळचाही भारताला धक्का ! आंब्याच्या आयातीवर घातली बंदी, सांगितले 'हे' मोठे कारण

Weather Alert: पुढील ४८ तास सतर्क राहा! अहिल्यानगर जिल्ह्यास ‘यलो अलर्ट’; दोन दिवस वादळी पाऊस अन् विजांच्या कडकडाटाचा इशारा

Amravati: शेतकरी कर्जमाफी योजनेत त्रुट्याच त्रुट्या; सुधारणा न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन, आमदार बच्चू कडूंचा इशारा

SCROLL FOR NEXT