Satara Latest Marathi News 
सातारा

बगाड मिरवणुकीची शेकडो वर्षांची परंपरा खंडित?; बावधनात यात्रांवर निर्बंध, जमावबंदी लागू

भद्रेश भाटे

वाई (जि. सातारा) : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर फुलेनगर (शहाबाग) व बावधन येथील ग्रामदेवतांच्या वार्षिक यात्रांच्या कार्यक्रमांवर स्थानिक प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. या यात्रांच्या कालावधीत ता. 27 मार्च ते चार एप्रिलपर्यंत प्रांताधिकाऱ्यांनी जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यामुळे यावर्षी यात्रेच्या निमित्ताने निघणारी पारंपरिक व वैशिष्ट्यपूर्ण बगाड मिरवणुकीची शेकडो वर्षांची परंपरा खंडित होणार की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

बावधन (ता. वाई) येथील भैरवनाथ-काशिनाथाची तसेच फुलेनगर (शहाबाग) येथील काळेश्वरी देवीची वार्षिक यात्रा दरवर्षी तीन दिवस भरते. यात्रेत देवाचा विवाह सोहळा, छबिना, बगाड मिरवणूक, तमाशा, कुस्त्यांचा फड असे कार्यक्रम होतात. यावेळी देवाला केलेल्या नवसाची परतफेड करण्यासाठी बगाड घेण्याची प्रथा आहे. होळी पौर्णिमेच्या दिवशीच्या रात्री बगाड्याचा कौल लावण्यात येतो. तेथून यात्रेस प्रारंभ होतो. फुलेनगरची बगाड मिरवणूक मंगळवारी (ता. 30), तर बावधन येथील बगाड मिरवणूक रंगपंचमीच्या दिवशी म्हणजे दोन एप्रिलला आहे. परिसरातील वाडीवस्त्या व गावांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी होत असतात.

तसेच यावेळी ग्रामदेवतेच्या दर्शनासाठी व बगाड मिरवणुकीचे दृष्य पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यांतून विविध गावांतून पै-पाहुणे व भाविक येतात. सद्य:स्थितीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले यांनी शहाबाग, फुलेनगर तसेच बावधन, पांढरेचीवाडी, वाघजाईवाडी, शेलारवाडी, म्हातेकरवाडी, अनपटवाडी, नागेवाडी, दरेवाडी, कणूर व कडेगाव या गावांत जमावबंदी आदेश लागू केला आहे. यात्रा कालावधीत नित्याचे धार्मिक विधी हे संबंधित पुजारी व पाच व्यक्‍तींच्या उपस्थितीत होतील. बगाड व छबिना काढण्यास तसेच करमणुकीच्या कार्यक्रमांना मनाई केली आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon : महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय! २७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा; तुमच्या भागात कसं असेल हवामान?

Land Acquisition: शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! भूसंपादनापूर्वी पोटहिस्सा निश्चित होणार, प्रत्यक्ष वहिवाटीनुसार मिळणार मोबदला

Rahul Gandhi: ‘मोदी-शहांना आम्ही वेडे करून सोडू’; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, आरएसएसचे कॉर्पोरेटायझेशन झाले..

शासनाची भन्नाट योजना! ३ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या गरजूंना आता न्यायालयातील केससाठी मिळणार मोफत वकील; जन्मदाखला काढण्यासाठीही विनाशुल्क मदत, वाचा....

आजचे राशिभविष्य - 14 ऑगस्ट 2026

SCROLL FOR NEXT