सातारा

सीईओ गौडांचा पहिल्याच दिवशी मॅरेथाॅन आढावा; विविध विभागांना अचानक भेट

प्रशांत घाडगे

सातारा : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी रुजू होताच सर्व विभागातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक बोलावली होती. नुकत्याच झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांकडून विविध विभागांच्या कामांचा आढावा घेतला. त्यामुळे "सीईओं'च्या कामाचा धडाका पहिल्याच दिवशी अधिकाऱ्यांना अनुभवता आला. 

या बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज ससे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, मुख्य लेखा वित्त अधिकारी विकास सावंत, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेश क्षीरसागर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) प्रभावती कोळेकर व इतर विभागातील अधिकारी उपस्थित होते. 

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून विनय गौडा यांची दहा दिवसांपूर्वी बदली झाली होती. मात्र, काही कारणास्तव श्री. गौडा उशिरा रुजू झाले. परंतु, कार्यभार स्वीकारताच पहिल्याच दिवशी अर्थ, सामान्य प्रशासन, समाजकल्याण, शिक्षण, आरोग्य, बांधकाम, कृषी, ग्रामपंचायत व इतर विभागांतील अधिकाऱ्यांनी राबविलेल्या योजना, उपक्रम व इतर बाबींची बैठकीत सविस्तर माहिती घेतली. प्रामुख्याने कोरोनाच्या संक्रमणाला आळा घालण्यासाठी उपाययोजना अधिक सक्षम कराव्यात, अशा सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत. याचबरोबर कामचुकारपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. 

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी व कोरोना संक्रमणाच्या काळात सर्व विभागातील अधिकाऱ्यांनी लढा देण्यासाठी प्रयत्न करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. याचबरोबर जिल्हा परिषदेत विविध विभागात कार्यरत असणारे 626 कर्मचारी बाधित झाल्याने काम करताना कर्मचाऱ्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन केले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP जॉइन करा अन् दर महिन्याला 50 हजार कमवा! असा मेसेज सगळीकडे का होतोय व्हायरल? यामागचा स्कॅम पाहून बसेल धक्का

Pune Riksha Fare: पुणेकरांना मोठा झटका! रिक्षाभाडेवाढीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात; लवकरच नवे दर हाेणार लागू

Almatti Dam Controversy : आलमट्टीच्या उंचीवरून कर्नाटकची मनमानी! महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात जावे; तज्ज्ञांचं आवाहन, काय म्हणाले केंगार?

Child Murder Case: एआयच्या मदतीने चिमुकल्याची हत्या! बिश्नोई गँगच्या नावाने १९९ रुपयांत सिमकार्ड खरेदी; कसा रचला भयानक कट?

Mumbai News: ना नोटीस, ना आदेश! जन्म-मृत्यू दाखल्यांच्या दुरुस्तीचे काम ठप्प, शाळा-कॉलेज प्रवेशासाठी धडपडणारे विद्यार्थी संकटात

SCROLL FOR NEXT