Satara Latest Marathi News 
सातारा

प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविरुध्द कोरेगावात 'भीक मांगो'; नागरिक उतरले रस्त्यावर

राजेंद्र वाघ

कोरेगाव (जि. सातारा) : शहरातील साखळी पुलाजवळ बांधलेले सार्वजनिक स्वच्छतागृह सुरू करण्याच्या मागणीसाठी सोनेरी ग्रुपने आज "भीक मांगो' आंदोलन केले. यासंदर्भातील माहिती देताना सोनेरी ग्रुपचे अध्यक्ष संतोष नलावडे यांनी सांगितले, की साखळी पुलाजवळील स्वच्छतागृहाचे काम पूर्ण करून दीड वर्ष झाले, तरी नगरपंचायत प्रशासनाने काही तांत्रिक बाबीमुळे ते खुले केले नाही. परिणामी नागरिकांमधून वारंवार तक्रारी येत होत्या. 

दरम्यान, या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याप्रकरणी नगरपंचायतीला सोनेरी ग्रुपने सातत्याने जाब विचारला. मात्र, त्यावर कोणताही ठोस निर्णय न झाल्याने संतप्त नागरिकांसह सोनेरी ग्रुपने गेल्या आठ फेब्रुवारी रोजी स्वच्छतागृहाच्या दारात उपोषणाला बसून या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्या वेळी चार दिवसांत स्वच्छतागृह सुरू करण्याचे आश्वासन नगरपंचायतीने दिले होते; परंतु पुन्हा एक महिना उलटल्यानंतरही स्वच्छतागृह सुरू झाले नाही. 

प्रोत्साहन निधी नसल्याचे कारण देत प्रशासन नागरिकांना झुलवत असल्याचे लक्षात आल्यानंतर सोनेरी ग्रुपने आज नगरपंचायतीला प्रोत्साहन निधीसाठी मदत म्हणून शहरात फिरून "भीक मांगो' आंदोलन केले. नगरपंचायतीच्या कार्यालयापासून जानाई गल्ली, कापड पेठ, बुरुडगल्ली, रामलिंग नगरमार्गे, जुने मोटार स्टॅंड अशा प्रमुख ठिकाणी आंदोलन करत शेवटी साखळी पुलाजवळील स्वच्छतागृहाच्या दारात ते संपले. या आंदोलनात सोनेरी ग्रुप, सोनेरी सखी मंच, कोरेगाव नगर विकास कृती समितीचे सदस्य सहभागी झाले होते. स्वच्छतागृह सुरू करण्याच्या मागणीसाठी एका महिन्यातच आज हे दुसरे आंदोलन झाले. 

नगरपंचायतीकडून शासनाकडे प्रस्ताव 

शहरातील स्वच्छतागृहाचे बिल अदा करण्यासाठी प्रशासकीय व आर्थिक मंजुरी देण्याबाबतचा प्रस्ताव कोरेगाव नगरपंचायतीने गेल्या चार मार्च रोजी स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) संचालकांना सादर केला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर स्वच्छतागृह सुरू केले जाईल. त्यामुळे आपण आंदोलन मागे घेऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे पत्र मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी आज सोनेरी ग्रुपला पाठवले आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT