सातारा

सातारा जिल्ह्यातील पडळ बनले 'सुकन्या समृद्धी गाव'; भारत सरकारच्या योजनेस 100 टक्के प्रतिसाद

धनंजय चिंचकर

कातरखटाव (जि. सातारा) : येथील उपडाकघर कार्यक्षेत्रात असलेल्या पडळ गावाने भारत सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेस 100 टक्के प्रतिसाद दिला असून, सातारा डाकघरचे प्रवर अधीक्षक अपराजिता म्रिधा यांच्या हस्ते या योजनेच्या खातेधारक मुलींना पासबुक वितरण करण्यात आले. 

पडळ येथील पोस्टमास्तर उत्तम सानप यांनी दहा वर्षांच्या आतील मुलींसाठी असणारी शासनाच्या सुकन्या समृद्धी योजना, डाकघर हे बॅंकेप्रमाणे कशाप्रकारे काम करते याची माहिती दिली. त्यानुसार नागरिकांनी सुकन्या समृद्धी योजनेस प्रतिसाद देत सर्व लहान मुलींची सुकन्या समृद्धी योजनेची खाती सुरू केली. याकामी डाकवितरक अशोक जाधव, डाकवाहक नारायण परीट यांची मदत मिळाली. 

अपराजिता म्रिधा यांच्या हस्ते व वडूज उपविभागाचे डाकनिरीक्षक धनेश यादव, वडूजचे डाकआवेक्षक डी. के. जाधव यांच्या उपस्थितीत नवीन खातेधारक मुलींना पासबुक वितरण झाले, तसेच पडळ गाव संपूर्ण सुकन्या समृद्धी गाव म्हणून घोषित करण्यात आले. पडळच्या उपसरपंच रंजना सानप व राजश्री सानप यांच्या हस्ते अपराजिता म्रिधा यांचे स्वागत झाले. उत्कृष्ट काम केल्याबद्दल उत्तम सानप, अशोक जाधव, नारायण परीट यांचे कौतुक करण्यात आले. या वेळी सिद्धनाथ सानप, प्रकाश सानप, उमेश जाधव, पांडुरंग सानप- पाटील, महादेव सानप, दिलीप नलवडे, मोहन वण्णे, शुभम सानप उपस्थित होते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Liquor Policy: मद्य व्यवसायात मोठे बदल! पारंपरिक मद्याला सरकारी मान्यता मिळणार; सरकारने लागू केले नवे नियम

Maharashtrachi Hasyajatra: प्रेक्षकांचा आग्रह सोनी मराठीने मानला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'बाबत घेतला 'हा' मोठा निर्णय

Tragic Drowning: गोदावरीत अंघोळीसाठी गेलेल्या दोन सख्या बहिणी व त्यांना वाचवताना चुलतीचा बुडून मृत्यू; मोहळा गावावर शोककळा

INDW vs PAKW: T20 World Cup आज रंगणार सर्वात मोठा थरार! भारत-पाकिस्तान मॅच कधी, कुठे आणि कशी पाहायची? वाचा सविस्तर

Ayodhya Ram Mandir Donation Scam: राम मंदिर देणगी घोटाळा प्रकरणात खळबळजनक प्रकार उघड, कर्मचाऱ्याने घरात शेणाच्या ढिगाऱ्यात लपवले १० लाख रुपये

SCROLL FOR NEXT