सातारा

नायगावात सावित्रीबाईंच्या जयंती सोहळ्यासाठी नियमावली जाहीर : जिल्हाधिकारी सिंह

अशपाक पटेल

शिरवळ (जि. सातारा) : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयंती सोहळा तीन जानेवारीला नायगाव (ता. खंडाळा) येथे साजरा होणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार फक्त 15 प्रशासकीय अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली असून, थोड्या-थोड्या वेळ्याने अन्य व्यक्तींना कार्यक्रम ठिकाणी सोडण्यात येणार आहे. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश काढला आहे. नायगाव ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू आहे. तीन जानेवारीला होणाऱ्या कार्यक्रमात जास्तीत जास्त 15 प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहतील. कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या व्यक्तींना थोड्या-थोड्या वेळानंतर कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रवेश देण्यात येईल. 

कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीमध्ये कमीत कमी दोन खुर्च्यांचे अंतर राहील, याप्रमाणे बैठक व्यवस्था करावी. कार्यक्रमाच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन, सॅनिटायझरचा वापर, मास्क आदी सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे. ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, याबाबत काटेकोरपणे पालन करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : राज्यात मॉन्सूनच्या पावसाचे जोरदार पुनरागमन; २६ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी

थकबाकीदार शेतकऱ्यांच्या याद्या बँकांकडून अपलोड! पहिल्या टप्प्यात थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी; कर्ज खात्यात जमा होणार दोन लाख रुपये, वाचा...

Latest Marathi News Live Update : नसरापूर प्रकरणात दोषी ठरलेल्या भीमराव कांबळेला आज विशेष न्यायालय शिक्षा सुनावणार

Vat Purnima Special Upvas Recipe: वट पौर्णिमेनिमित्त बनवा खास, चवदार आणि उपवासासाठी बेस्ट उकडलेल्या रताळ्याचा हेल्दी कीस! लगेच नोट करा रेसिपी

Samsung Success Story: कधी मासे आणि नूडल्स विकायची! आज अब्जावधी डॉलरचं टेक साम्राज्य; Samsung च्या यशाचं गुपित काय?

SCROLL FOR NEXT