सातारा

मोदी सरकारविरोधात साताऱ्यात कॉंग्रेसचा आक्रमक पवित्रा

प्रशांत घाडगे

सातारा : मोदी सरकारने कृषीविषयक शेतकरीविरोधी मंजूर कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर लाखो शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. या शेतकऱ्यांसोबत चर्चा न करता आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत असल्याने केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी कॉंग्रेसतर्फे जिल्हा कॉंग्रेस समितीसमोर नुकतेच आंदोलन करण्यात आले. 

याप्रसंगी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, जिल्हा महिला कॉंग्रेस अध्यक्षा धनश्री महाडिक, रजनी पवार, सुषमा राजेघोरपडे, मनोजकुमार तपासे, अन्वर पाशा खान, माधुरी जाधव, ऍड. दत्तात्रय धनावडे, रझिया शेख, रिजवान शेख, सूरज कीर्तीकर, शरद मोरे व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. डॉ. जाधव म्हणाले, "केंद्र सरकारच्या तीन कृषीविषयक कायद्यांविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. या कायद्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार आहे. या कायद्याविषयी मोदी सरकारने शेतकऱ्यांसोबत चर्चा न करता आंदोलनातील शेतकऱ्यांना मारहाणीचा प्रकार घडवून आणला. या घटनेचा कॉंग्रेसने तीव्र निषेध करत शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.'' 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: पीयुष चावलाने हैदराबादला दिला मोठा दणका! धोकादायक ट्रेविस हेडला धाडलं माघारी

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT