सातारा

भारीच! सातारा जिल्ह्यातील किरकसाल निवडणार 'ग्रामपक्षी'

फिरोज तांबोळी

गोंदवले (जि. सातारा) : वन्यजिवांच्या संरक्षण व संवर्धनासाठीच्या कामाला अधिक चालना मिळावी म्हणून लवकरच गाव पक्षी निवडण्याचा निर्धार किरकसालकरांनी केला आहे. त्यासाठी दहिवडी वन विभागाने वन्यजीवप्रेमींच्या हातात हात दिला आहे. 

किरकसाल (ता. माण) येथील जैवविविधता संरक्षण व संवर्धन समितीने चर्चासत्र झाले. यावेळी पक्षी मित्र चिन्मय सावंत यांनी स्लाइड शोतून विविध पक्ष्यांचा माहितीपट मांडला. वन्यजीव संवर्धन व संरक्षणासाठी किरकसालमध्ये कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. प्राणी व पक्ष्यांच्या नव्याने विविध प्रजाती निदर्शनात येत आहेत. त्यातून गाव पक्षी म्हणून एका पक्ष्याची निवड करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. वन विभागाच्या सहकार्यातून लवकरच ही पक्षी निवडणूक घेण्यात येणार आहे.

यावेळी वन अधिकारी श्री. मुळे म्हणाले, "मानवी जीवनात पक्ष्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अन्न साखळीतील महत्त्वाचा घटक म्हणून पक्षी मोलाचे काम करतात म्हणूनच त्यांचे संरक्षण व संवर्धन करण्याची सर्वांची जबाबदारी आहे. किरकसालमध्ये गाव पक्षी निवडणूक उपक्रमातून लोकांना वन्यजीव संवर्धन व संरक्षणासाठी प्रेरणा मिळेल.'' जैवविविधता समितीचे अध्यक्ष अमोल काटकर म्हणाले, "निसर्गाच्या आवडीतून संवर्धनासाठी ग्रामस्थांचे चांगले सहकार्य मिळत आहे. मारुती चित्तमपल्ली यांना प्रत्यक्ष भेटून गावात अधिकाधिक चांगले काम करण्यासाठी प्रयत्न करू.'' वनरक्षक एस. एम. गलांडे, सुनील काटकर यांची भाषणे झाली. दरम्यान, पक्षी सप्ताहानिमित्त घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. यावेळी विशाल काटकर, प्रकाश काटकर, वनपाल एम. ए. पवार, ए. डी. सावंत, वनरक्षक उपस्थित होते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : शाळेच्या वेळेत मुख्याध्यापिका झोपेत, मद्यधुंद पतीची खुर्चीत बसून अरेरावी, संतप्त पालकांनी थेट शाळेला ठोकले कुलूप

Commonwealth Games 2026: राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारताचे १२५ खेळाडू सज्ज; जाणून घ्या खेळाडूंची यादी अन् Live Streaming Chanel

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रीचं बॉलिवूडमध्ये पदार्पण; 'या' चित्रपटातून करणार नवी इनिंग

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनाला सुरुवात, आदित्य ठाकरे अन् संजय राऊतही उपस्थित

Smart Meter Issue : ५०० रुपयांचे बिल थेट २००० वर! ठाण्यातील श्रीनगर वारलीपाड्यात'स्मार्ट मीटर'ची सक्ती; नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT