Satara Latest Marathi News 
सातारा

कोणाचीही गय नको, कोरोनाचे निर्बंध आणखी कडक करा : सभापती रामराजेंच्या प्रशासनाला सक्त सूचना

Balkrishna Madhale

सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे जे निर्बंध लावले आहेत ते अधिक कडक करावेत. तसेच स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्व साधारण रुग्णालयातील आरटीपीसीआर लॅबची क्षमता वाढवून कोरोना टेस्टींगचे प्रमाण वाढवावे, अशा सूचना विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आज कोरोना संसर्ग आढावा बैठक विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत  होते. या बैठकीला पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल आदी उपस्थित होते.

सभापती रामराजे पुढे म्हणाले, जिल्ह्यातील तरुणांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, जो कोणी नियमांचे पालन करणार नाही अशांवर कारवाई करावी. सध्या जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत असून कोणताही रुग्ण बेडपासून वंचित राहणार नाही, तसेच रुग्णास सहजपणे बेड उपलब्ध व्हावा यासाठी प्रशासनाने दक्षता घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी शेवटी केल्या. कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढत आहे. रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची जास्तीत-जास्त कोरोना टेस्टींग करावे, अशा सचूना करुन पालकमंत्री पाटील पुढे म्हणाले, शासनाने घातलेल्या निर्बंधाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. मास्क घालणार नाहीत अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी. तसेच लग्न समारंभावर लक्ष ठेवावे. त्याचबरोबर रात्री 8 नंतर 5 पेक्षा अधिक नागरिक एकत्र येणार नाहीत याचीही दक्षता पोलिसांनी घ्यावी.

लग्न समारंभ, बार, रेस्टॉरंट यांच्यावर पोलिस विभागाच्या माध्यमातून वेळोवेळी तपासणी करण्यात येईल. ज्या ठिकाणी नियमांचे पालन होणार नाही तेथे तात्काळ कारवाई करण्यात येईल, असे गृह राज्यमंत्री देसाई यांनी या बैठकीत सांगितले. स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्व साधारण रुग्णलयातील आरटीपीसीआर लॅबची क्षमता वाढविण्यासाठीचा प्रस्ताव द्यावा, या लॅबसाठी केंद्राकडून मदत मिळवून देण्यासाठी  प्रयत्न करणार असल्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी सांगितले. यावेळी आमदार शिंदे, आमदार मकरंद पाटील, आमदार चव्हाण यांनी उपयुक्त अशा सूचना केल्या. या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Union Budget 2026 Live : मंदिरांसाठी ५ हजार कोटींची तरतूद, अर्थमंत्री सीतारामन यांची घोषणा

Union Budget 2026 : अर्थसंकल्पात पुण्यासाठी मोठं गिफ्ट ! मुंबई- पुणे हायस्पीड ट्रेन कॉरिडॉरची घोषणा, दोन्ही शहरांतील अंतर होणार आणखी कमी

Stock Market Updates : बजेटसुरू होताच शेअर बाजार उसळला! सरकारचा 7 धोरणात्मक क्षेत्रांवर भर, कोणते सेक्टर तेजीत?

Union Budget 2026 : भारतात सुरू होणार सेमी कंडक्टर मिशन; यंदा 40 हजार कोटी रुपयांच्या बजेटची तरतूद, तंत्रज्ञान क्षेत्रावर जास्त भर

Union Budget 2026 : खादी, हातमाग व हस्तकला क्षेत्राला अर्थसंकल्पातून मिळणार नवे बळ; निर्मला सीतारामन यांची अर्थसंकल्पात मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT