Satara Latest Marathi News 
सातारा

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट; 24 तासात रुग्णसंख्या पाचशे पार

प्रशांत घाडगे

सातारा : गेल्या तीन महिन्यापासून कोरोना बाधितांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. जिल्ह्यात मागील सहा महिन्याच्या तुलनेत दुसऱ्या टप्प्यातील सर्वाधिक 532 रुग्ण आज आढळले असून, चार बाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या चिंताजनक असून, कोरोना नियमांचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने कडक भूमिका घेण्याची गरज आहे. 

गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत होता. त्यानंतर ऑक्‍टोबरनंतर कोरोनाचे मृत्यू व बाधितांच्या संख्येत घट झाली. जानेवारी महिन्यापर्यंत दररोज सरासरी 60 ते 80 बाधित रुग्ण आढळत होते. मात्र, गेल्या महिनाभरापासून 250 ते 350 च्या जवळपास बाधित रुग्ण सापडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील कऱ्हाड, खंडाळा, फलटण, वाई ही तालुके हॉट्‌स्पॉट असून या ठिकाणी निर्बंध कडक केले असून, प्रशासन सतर्क झाले आहे. 

दरम्यान, आज जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयात सदरबझार सातारा येथील 58 वर्षीय पुरुष, तारळे (ता. पाटण) येथील 65 वर्षीय पुरुष, मोर्वे (ता. खंडाळा) येथील 72 वर्षीय पुरुष व खासगी हॉस्पिटलमध्ये करंजे (जि. पुणे) येथील 57 वर्षीय पुरुष अशा एकूण चार बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. 

कोरोना अपडेट्‌स 

  • एकूण नमुने : 4,06,322 
  • एकूण बाधित : 66,063 
  • घरी सोडण्यात आलेले रुग्ण : 60,217 
  • एकूण मृत्यू : 1,910 
  • उपचारार्थ रुग्ण : 3,936 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HIV injection attack : लग्न मोडलं… सूडाने पेटलेल्या तरुणाने तरुणीला दिलं एचआयव्ही बाधित रक्ताचं इंजेक्शन; संपूर्ण प्रकरण काय?

LPG Connection Rules : ...तर 'या' ग्राहकांना एलपीजी सिलिंडर मिळणार नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Katha Arunachi Marathi Play : मिलिंद शिंदे यांची 'कथा अरुणाची' नाटकातील संघर्षमय यात्रा

कुंभ राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): मंगळ-बुध युतीचा प्रभाव, गुढीपाडव्यापासून शुभ संकेत

New Marathi Book : मराठी भाषेच्या वर्तमानावर डॉ. सुधीर रसाळ यांचे परखड चिंतन

SCROLL FOR NEXT