सातारा

फलटण-कोरेगावातील नागरी प्रश्न सोडवण्यासाठी 'फलटण संवाद'ची निर्मिती : संजीवराजे

किरण बोळे

फलटण शहर (जि. सातारा) : फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी "फलटण संवाद' या ऍपची निर्मिती करण्यात आली आहे. नागरिकांनी सदर ऍप डाउनलोड करून त्याद्वारे आपले प्रश्न, समस्या मांडाव्यात, असे आवाहन सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी केले आहे. 

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, फलटण बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक- निंबाळकर, संजीवराजे नाईक- निंबाळकर यांच्या संकल्पनेतून "फलटण संवाद' या ऍपची निर्मिती करण्यात आली आहे. सध्याच्या डिजिटल युगात नागरिकांना घरी बसूनच आपली तक्रार अथवा समस्या "संवाद'या ऍपद्वारे मांडता येणार आहे. 

फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत, असे स्पष्ट करून, यामुळे नागरिकांना केव्हाही व कोठूनही आपली समस्या थेट मांडता येणार आहे. त्यामुळे जास्तीतजास्त नागरिकांनी आपले प्रश्न व समस्या मांडण्यासाठी या ऍपचा वापर करावा, असे आवाहनही संजीवराजे यांनी नागरिकांना केले आहे. https://is.gd/PhaltanSanwad या लिंकद्वारे "फलटण संवाद' हे ऍप नागरिकांना करता येणार आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; सूत्रांची माहिती

Morning Breakfast: सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा पनीर रोस्टी, नोट करा रेसिपी

World Press Freedom Day 2024 : जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास

Sakal Podcast : जळगावात कोणाचं पारडं जड? ते इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल

Latest Marathi News Live Update : भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी अमित शहा आज कर्नाटक दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT