ऊसतोड मजुरांच्या मतदानासाठी धडपड; माणदेशातील पॅनेलप्रमुख, उमेदवारांकडून हालचाली

केराप्पा काळेल
Monday, 4 January 2021

माण तालुक्‍यातील अनेक गावांतील मोठ्या प्रमाणावर ऊसतोड मजूर राज्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये स्थलांतरित आहेत. कर्नाटक, सातारा, सांगली, कोल्हापूर या साखर कारखान्यांच्या परिसरातील गळीत हंगामासाठी अनेक माणदेशी ऊसतोड मजूर स्थलांतरित आहेत. त्यामुळे गावागावांतील उमेदवारांसह पॅनेलप्रमुख हे स्थलांतरित ऊसतोड मजूर मतदारांच्या संपर्कामध्ये आहेत.

कुकुडवाड (जि. सातारा) : माण तालुक्‍यामध्ये ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, रणधुमाळीला वेग आला आहे. गावोगावी पॅनेलप्रमुख, उमेदवार निवडणूक ताकदीने लढवण्याची तयारी करत आहेत. त्यात काही चाणाक्ष पॅनेलप्रमुख स्थलांतरित ऊसतोड मजुरांना मतदानासाठी गावी आणून त्यांचे निर्णायक मत आपल्या पारड्यात कसे पडेल, यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. 

तालुक्‍यातील अनेक गावांतील मोठ्या प्रमाणावर ऊसतोड मजूर राज्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये स्थलांतरित आहेत. कर्नाटक, सातारा, सांगली, कोल्हापूर या साखर कारखान्यांच्या परिसरातील गळीत हंगामासाठी अनेक माणदेशी ऊसतोड मजूर स्थलांतरित आहेत. त्यामुळे गावागावांतील उमेदवारांसह पॅनेलप्रमुख हे स्थलांतरित ऊसतोड मजूर मतदारांच्या संपर्कामध्ये आहेत. परमुलखातील या मतदारांना मतदानासाठी कसे आणता येईल, याचे नियोजन सुरू आहे. संबंधित मुकादमाकडून कारखाना, त्यांचे राहण्याचे ठिकाण, त्यांचा संपर्क क्रमांक घेण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे. प्रत्येक निवडणुकीत ऊसतोड मजुरांची मते निवडणुकीत निर्णायक ठरतात. त्यामुळे पॅनेलप्रमुख, उमेदवार ऊस तोडणी मतदारांचा येण्या-जाण्याचा, खाण्यापिण्याचा सर्व खर्च करून त्यांना गावी आणतात. ऊसतोड मजूरही आनंदाने मतदानासाठी गावी येण्यास उत्सुक असतात. हे मजूर मतदानाच्या निमित्ताने आपल्या कुटुंबातील, घराकडील मंडळींची भेट घेण्यासाठी आतुरलेले असतात. शिवाय दोन-तीन दिवसांची कामातून सुटी पण मिळते. 

काकांनी उदयनराजेंना राजकारणातील हिरो बनविले

वयस्कर लोकांसह लहान मुले घरीच 
माण तालुक्‍यातील विविध गावांमधून वृद्ध, महिला व पुरुष हजारो मतदार कुटुंबातील सदस्यांसमवेत कारखाना परिसरात रोजगाराच्या निमित्ताने गेलेले आहेत. सध्या घरी वयस्कर मंडळी आणि लहान मुले वास्तव्यास आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara News Speed The Grampanchayat Election Campaign In Maan Taluka