Satara Latest Marathi News 
सातारा

कोयनेतील मारूलमध्ये अतिसारामुळे तीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू; 40 जणांवर उपचार सुरू

विजय लाड

कोयनानगर (जि. सातारा) : कोयना विभागातील मारूल तर्फ पाटण येथे दोन दिवसांपासून नागरिकांना उलट्या व जुलाबाचा त्रास होत आहे. अतिसारामुळे गावातील तीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. गावातील 40 ग्रामस्थांवर पाटण येथे ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 
नादुरुस्त व गंजलेल्या पाइपलाइनमधून गावाला अस्वच्छ पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना दोन दिवसांपासून उलट्या व जुलाबाचा त्रास होत आहे. अतिसाराच्या साथीमुळे अनेक ग्रामस्थांना हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्र व पाटण येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासासाठी दाखल केले आहे. गावातील सुतारवस्ती (शेळकेवस्ती) येथील जान्हवी संजय लोहार (वय 3) हिला त्रास जाणवू लागल्याने पाटण येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. 

पुढील उपचारांसाठी तिला कऱ्हाड येथे घेऊन जाताना वाटेतच तिचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे परिसरात चिंता वाढली आहे. पाटण तालुका वैद्यकीय अधिकारी रघुनाथ पाटील यांनी हा मृत्यू अतिसारामुळे झाला नसून त्या मुलीला फिट आल्याने तिचा वाटेतच मृत्यू झाला असल्याचे स्पष्ट केले. गावातील प्रत्येक घरात आरोग्य तपासणी केली आहे. साथ सध्या नियंत्रणात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

मानसवेध : तमसो मा ज्योतिर्गमय

विशेष : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भविष्यातील निर्णय

Poha-Rava-Curd Pancake: पोहे नेहमीच बनवता? एकदा करून पाहा पोहे-रवा दही पॅनकेक; चवीला कुरकुरीत, आतून मऊ!

SCROLL FOR NEXT