Satara Latest Marathi News 
सातारा

सर्पमित्रांची कायदेशीर नोंदणी करा, अन्यथा सगळीकडे काम बंद आंदोलन

जगन्नाथ माळी

उंडाळे (जि. सातारा) : सर्पमित्रांची कायदेशीर नोंदणी करण्यात यावी, यासाठी महाराष्ट्रातील सर्पमित्र 23 मार्च रोजी मुख्यमंत्री, सर्व जिल्हाधिकारी, वनविभागाचे अधिकारी यांना निवेदन देणार आहेत. मागण्यांचा 45 दिवसांत विचार नाही केल्यास सगळीकडे काम बंद आंदोलन करणार असल्याची माहिती सर्पमित्र विकास माने व निखिल मोहिते यांनी दिली. 

सर्पमित्र अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून सापांना वाचवण्याचे काम करत असतात; परंतु कायद्याआडून त्यांना अनेक वेळा बोलले जाते, तसेच काही तोतया सर्पमित्रांकडून चुकीच्या पद्धतीने साप पकडून सापांना त्रास दिला जातो, तसेच साप पकडण्याच्या नावाखाली सामान्य जनतेकडून गरजेपेक्षा जास्त पैशांची उकळ केली जाते. हे सर्व थांबून सर्पमित्रांची कायदेशीर नोंदणी करण्यात यावी, तसेच एखाद्या घरात साप आला तर पहिल्यांदा जवळच्या वनविभाग कार्यालयात दूरध्वनी करावा, दूरध्वनी केलेल्या व्यक्तीचे नाव, नंबर व पत्ता कार्यालयात नोंद करण्यात यावे.

चिलीम आणि कोंबडीचं रक्त दिलं की धावजी पाटील प्रसन्न होताे...! 

तसेच वनविभाग कार्यालयातून नोंदणीकृत सर्पमित्रांना कळविण्यात यावे, तसेच पकडलेला साप त्याच दिवशी वनविभाग कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली सोडण्यात यावा. यासारख्या मागण्यांसाठी महाराष्ट्रातील सर्पमित्र 23 मार्च रोजी मुख्यमंत्री, सर्व जिल्हाधिकारी, वनविभागाचे अधिकारी यांना निवेदन देणार आहेत. मागण्यांचा 45 दिवसांत विचार नाही केल्यास सगळीकडे काम बंद आंदोलन करण्यात येणार असून, येणारे सगळे दूरध्वनी वनविभाग कार्यालयाला पाठवण्यात येणार आहेत, असे या वेळी सर्पमित्र माने व मोहिते यांनी सांगितले.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT