सातारा

मेडीकल कॉलेज जागा हस्तांतरणासाठी 61 कोटींची तरतूद; शिवेंद्रसिंहराजेंनी मानले उपमुख्यमंत्र्यांचे आभार

उमेश बांबरे

सातारा : अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन जिल्ह्याचा मेडिकल कॉलेजचा प्रश्‍न मार्गी लागण्यासाठी वाढीव जागा हस्तांतरणाचा प्रश्‍न सोडवावा, अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. या मागणीवरून झालेल्या बैठकीत वाढीव 60 एकर जागा हस्तांतरणाचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी 61 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे मेडीकल कॉलेजचा प्रश्‍न मार्गी लावण्यात शिवेंद्रसिंहराजेंना यश आले आहे. त्यांनी अजित पवार, पालकमंत्री पाटील यांचे जिल्हावासियांच्यावतीने आभार मानले आहेत. 

विधानसभेच्या दोन दिवसीय अधिवेशनादरम्यान आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी विविध विकासकामांसोबतच मेडिकल कॉलेजचे काम पूर्ण होण्यासाठी तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. यानंतर श्री. पवार यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यामध्ये कृष्णानगर येथील कृष्णा खोरे विभागाची 25 एकर जागा अधिगृहीत केली होती. उर्वरीत 60 एकर जागा हस्तांतरीत करण्यात यावी. त्यासाठीच्या प्रशासकीय बाबी पूर्ण कराव्यात आणि मेडिकल कॉलेज उभारणीस प्रारंभ होण्यासाठी निधीची तरतूद करावी, अशी मागणी शिवेंद्रसिंहराजे यांनी केली. यानंतर श्री. पवार यांनी तातडीने वाढीव 60 एकर जागा मेडिकल कॉलेजसाठी हस्तांतरीत करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. मेडिकल कॉलेजसाठी वैद्यकीय शिक्षणमधून 61 कोटींची तरतूद श्री. पवार यांच्या सुचनेनुसार करण्यात आली आहे. दरम्यान, मेडिकल कॉलेज नाशिक विद्यापीठाला संलग्न करण्याचा निर्णयही झाला असून आता नॅशनल मेडिकल कमिशन मार्फत येत्या 15 दिवसांत प्रत्यक्ष पाहणी होऊन पुढील कार्यवाही सुरु होणार आहे. 

कासच्या कामांसाठी 57.29 कोटी मंजूर 

कास धरण उंची वाढविण्यासाठी आवश्‍यक 57. 29 कोटींचा निधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंजूर केला. यामुळे धरणाच्या कामातील अडथळा दुर झाला असून याबद्दल आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी अजित पवार यांचे आभार मानले. निधीअभावी कास धरणाचे काम रखडले होते. हे काम पूर्ण होण्यासाठी निधी मिळावा, अशी मागणी शिवेंद्रसिंहराजेंनी श्री. पवार यांच्याकडे केली होती. यानुसार श्री. पवार यांनी अधिवेशनात या प्रकल्पाच्या कामासाठी वाढीव 57 कोटी 29 लाखांची निधीची तरतूद केली. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Schedule : १४ वन डे, १६ ट्वेंटी-२० अन् ७ कसोटी! IPL 2027 पर्यत टीम इंडियाचं वेळापत्रक; विराट, रोहितच्या फॅनसाठी मेजवानी

FDA: एफडीएचा दणका! IRCTCचे बेस किचन आणि इस्कॉनमध्ये धडक कारवाई, कॅटरर्सचे परवाने थेट निलंबित

तेजश्री प्रधान जर ८० च्या दशकातील हिरोईन असती तर... पाहा झक्कास फोटो, तुम्हीही सहज बनवू शकता

Marathi News Live Updates : पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने उचलले टोकाचं पाऊल

वीज गेली, मेणबत्तीच्या उजेडात रुग्णावर उपचार करण्याची वेळ; सरकारी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT