Satara Latest Marathi News 
सातारा

बाजार कराच्या ठेक्‍यातही 'राजकारण'; नवा ठेका आरोपांच्या पिंजऱ्यात अडकण्याची भीती!

सचिन शिंदे

कऱ्हाड (जि. सातारा) : कोरोनामुळे शहरातील विक्रेत्यांकडून बाजार कर वसुली तोट्यात होती. त्याला मुदतवाढ देण्याची मागणी डावलून तो ठेका नगरसवेकाच्या नातेवाईकांच्या हिस्सेदारीतील ठेकेदाराला देण्यात आला आहे. त्यामुळे बाजार कर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बाजार कराचा ठेका देण्याची प्रक्रिया चुकीची आहे, अशी तक्रार जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे दाखल केली आहे. संबंधित ठेकेदार पालिकेचा थकीत असतानाही बाजार कराचा ठेका देण्यात आल्याने त्यातील राजकीय हस्तक्षेप स्पष्ट झाला आहे. 

लॉकडाउनने पालिकेच्या बाजार करावर गंडांतर आले. बाजार कराचे तब्बल 15 लाखांचे उत्पन्न बुडाले होते. आठवडा बाजार बंद असल्याने पालिकेचे रोजचे उत्पन्न थांबले होते. पुन्हा मिळेल, अशी अपेक्षाही नसल्याने त्याचे पैसे माफ करण्याची मागणी ठेकेदाराने केली होती. त्याचाही प्रस्ताव पाठवला आहे. त्याचा निर्णय होण्यापूर्वीच नगरसवेकाच्या नातेवाईकाच्या जवळील ठेकेदाराला राजकीय दबावाने ठेका दिला आहे. त्यावरून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. तोही ठेकेदार वादातीत ठरतो आहे. 

नगरसेवकाच्या नातेवाईकासह मुख्याधिकाऱ्यांनी पालिकेच्या थकीत यादीतील ठेकेदाराला तो ठेका का दिला, याची सखोल चौकशीची मागणी प्रहार संघटनेने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे केली आहे. त्यामुळे नवा ठेका आरोपांच्या पिंजऱ्यात अडकण्याची भीती आहे. वास्तविक ज्याला ठेका दिला तो ठेकेदार पालिकेचे तब्बल तीन लाखांचे देणेकरी आहे, अशा स्थितीत तो ठेका त्याला देणे कायदेशीर आहे का, असा प्रश्न उपस्थित करत प्रहार संघटनेने या सगळ्या प्रक्रियेलाचा चौकशीच्या पिंजऱ्यात अडकवले आहे. त्यामुळे बाजार कराभोवती पुन्हा अडचणी येणार आहेत. 

मार्ग मोकळा करून ठेका फिरवला 

मार्चपासूनच्या सात महिन्यात आजअखेर सुमारे 15 लाखांच्या उत्पन्नावर पालिकेला पाणी सोडावे लागले आहे. बाजार कर गोळा करण्याचा ठेका पालिका देते, तो तब्बल 20 लाखांच्या आसपास आहे. त्यातील 15 लाखांचेच उत्पन्न बुडाल्याने संबंधित ठेकेदारांकडून बाजार कर ठेक्‍यात सूट मिळावी, अशी मागणी पूर्वीच्या ठेकेदाराने केली होती. मात्र, त्यावर निर्णय घेऊन मुदतवाढ देण्याचे टाळून पालिकेने पैसे माफ करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला. त्यामुळे दुसऱ्या ठेकेदराला ठेका देण्याचा मार्ग मोकळा करून घेतला. त्यामुळे यातही राजकीय हस्तेक्षेप झाल्यामुळेच अधिकाऱ्यांना निर्णय घ्यावा लागला आहे, असे स्पष्ट आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT