सातारा

कोळकीतील मालोजीनगर, शारदानगरात आकडे टाकून खुलेआम विजेची चोरी

संजय जामदार

कोळकी (जि. सातारा) : वीज वितरण कंपनीच्या चुकीच्या कारभारामुळे येथील मालोजीनगर, शारदानगर भागामध्ये वीज चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. या ठिकाणी काही लोकांकडून वीजवाहक तारांवर आकडे टाकून खुलेआम विजेची चोरी सुरू आहे. दिवस-रात्र हे आकडे तारांवर लटकलेलेच असतात. 

या वीजवाहक तारा मुख्य रस्त्यावरच आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून येथे निवासी भाग घोषित होण्यापूर्वीपासून येथील शिंगणापूर रोडलगत वीज वितरण कंपनीचे उपकेंद्र आहे. या उपकेंद्रावर वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांची तसेच अधिकाऱ्यांची नेहमी ये-जा सुरू असते. विशेष म्हणजे या उपकेंद्राच्या जवळच खुलेआम वीज चोरी सुरू असल्याने ग्रामस्थांमधून आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

वीजवाहक तारांवर आकडे टाकणाऱ्या लोकांचे व वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे काही आर्थिक लागेबांधे आहेत का? असा सवालही ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत. चोरून फुकट वीज वापरणाऱ्यांचा वीजभार प्रामाणिकपणे वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांवर पडत असल्याने असे ग्राहक वीज वितरण कंपनीवर संतापले आहेत. ही वीज चोरी कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली तर "तुम्ही अधिकाऱ्यांशी बोला' असे उत्तर ग्रामस्थांना ऐकायला मिळते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Students Protest : 'विरोधकांना संधी मिळाली की, ते वातावरण चिघळविण्याचा प्रयत्न करतात'; जंतरमंतर आंदोलनावरुन छगन भुजबळ यांची टीका

Mumbai Local Train: लोकलमधील गर्दी संपणार, दर २ मिनिटांनी ट्रेन धावणार; रेल्वे प्रशासनाचा नवा प्लॅन

Latest Marathi Update : जंतर-मंतरवर CJP आंदोलक आणि निहंग शीख आमनेसामने; धक्काबुक्की, परिस्थिती तणावपूर्ण

Arijit Singh Student Protest : 'माझी गाणी डिलीट करा, माझं अस्तित्व विसरा, पण स्टुडंट प्रोटेस्टला माझा पाठींबा राहणार! अरिजीत सिंहचे वक्तव्य व्हायरल

Madhya Pradesh UCC: मध्य प्रदेशमध्ये एकापेक्षा जास्त विवाहांवर बंदी! महिलांना मिळणार पुरुषांइतकाच संपत्तीचा अधिकार, 'UCC' विधेयक मंजूर

SCROLL FOR NEXT