Satara Latest Marathi News 
सातारा

पुसेगावात कचरा डेपोमुळे नागरिकांचा जीव धोक्यात; प्रशासनाकडून आरोग्याशी खेळ?

ऋषिकेश पवार

विसापूर : पुसेगाव (ता. खटाव) ग्रामपंचायतीमार्फत घंटागाडीच्या माध्यमातून गोळा केलेला कचरा गावानजीक कचरा डेपोत अस्ताव्यस्त टाकण्यात येतो. त्याची विल्हेवाट लावण्यासाठी बऱ्याचदा हा कचरा जाळला जातो. पुसेगाव ग्रामपंचायत या कचऱ्याचे वर्गीकरण करत नसल्याने येथील परिसरात धूर, दुर्गंधी अशा अनेकविध समस्या निर्माण होत आहेत. 

शाळा, महाविद्यालय, नागरी वस्ती या डेपोपासून काही अंतरावरच असल्याने विषारी धूर आणि कुबट दुर्गंधीचा नाहक त्रास नागरिकांसोबत विद्यार्थ्यांना सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. हा प्रकार गंभीर असूनदेखील प्रशासन नागरिकांच्या आरोग्याशी का खेळत आहे, असा संतप्त सवाल येथील नागरिक उपस्थित करत आहेत. श्री सेवागिरी विद्यालयापासून काही अंतरावर आटाळी शिवारात येरळा नदीकाठी हा डेपो आहे. 

बऱ्याचदा या कचऱ्याची विल्हेवाट जाळून लावण्यात येत असून, त्याचा धूर दिवस-रात्र धुमसत असतो. हा धूर परिसरातील शेत-शिवारात तसेच घरांमध्ये जात असल्याने शेतकरी, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या विषारी धुरामुळे पिकांवरदेखील वाईट परिमाण होत असून, पिकाचा दर्जा घसरत असल्याचे परिसरातील शेतकरी सांगत आहेत. अनेकदा या कचरा डेपोत येणारे प्लॅस्टिक वाऱ्यामुळे इतरत्र शेतात जाऊन शेतीची उत्पादकतादेखील कमी होत असल्याच्या तक्रारी येतात. ग्रामपंचायतीने ओला आणि सुका कचरा वेगवेगळा गोळा करण्याचा निर्णय घ्यावा किंवा हा डेपो इतरत्र तरी हलवावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

"पुसेगावच्या कचरा डेपोत उघड्यावर कचरा आणून टाकला जातो. हा कचरा ग्रामपंचायत वर्गीकरण न करता जाळत असल्याने दूषित धुरामुळे पिकांचे नुकसान होत आहे. तसेच वाऱ्यामुळे डेपोतील प्लॅस्टिक कचरा, जळालेला कचरा शेतात येत असल्याने शेतीची उत्पादकता कमी होण्याची शक्‍यता आहे.'' 

-राहुल जाधव, प्रगतशील शेतकरी, पुसेगाव

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Politics: मतांसाठी उमेदवार घासत आहेत भांडी; पश्‍चिम बंगालमध्‍ये नवा फंडा; सभांपेक्षा मतदारांशी ‘जवळीक’ महत्त्वाची..

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : गौतम अदानी अयोध्येत दाखल

SCROLL FOR NEXT