Satara Latest Marathi News Satara News 
सातारा

माजी मुख्यमंत्र्यांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेला सोशल मीडियावर जोरदार 'दाद'

हेमंत पवार

कऱ्हाड (जि. सातारा) : माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) सैदापूर (ता. कऱ्हाड) येथे आज दुपारी लग्न सोहळ्यासाठी गेले होते. तेथून परत येत असताना सैदापूर कॅनॉलवर गर्दी दिसली. त्यांनी गाड्यांचा ताफा थांबवत स्वतः गर्दीत जाऊन चौकशी केली. एका वृद्धेला रिक्षाने धडक दिल्याने ती जखमी झाली होती. रक्तबंबाळ अवस्थेतील वृद्धेला तातडीने त्यांनी आपल्या वाहनांच्या ताफ्यातील गाडीतून रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. त्यामुळे माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी दाखवलेली संवेदनशीलता चर्चेचा विषय ठरली. 

सैदापूर येथील कार्यकर्त्याच्या कुटुंबातील लग्न सोहळ्याला आमदार चव्हाण हे आज दुपारी गेले होते. लग्न सोहळ्यावरून कऱ्हाडला परत येताना सैदापूर कॅनॉलजवळ त्यांना गर्दी दिसली. त्यांनी गाडी थांबवण्याच्या सूचना दिल्या. ते गाडीतून उतरले. गर्दीत जाऊन पाहिल्यावर अपघात झाल्याचे समजले. 

एका वृद्धेला रिक्षाने धडक दिली होती. त्यांनी जखमी वृद्धेची (Injured Woman) चौकशी करून तिला तातडीने रुग्णालयात नेण्याची विनंती केली. त्यांच्यासमवेत असलेल्या नगरसेवक इंद्रजित गुजर यांच्या कारमधून वृद्धेला उपचारासाठी हॉस्पिटलला नेले. पृथ्वीराज चव्हाण यांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेची परिसरात व सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भिवडी येथे कारखान्यात भीषण स्फोट; सात ठार, बेकायदा फटाके निर्मिती सुरू असल्याचा दावा

Pune Crime : पोलिसांकडून आंतरराज्यीय टोळी उद्ध्वस्त, सव्वाचार कोटींचे मेफेड्रोन जप्त

Latest Marathi News Update : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Sunetra Pawar: शाळांना अल्पसंख्याक दर्जा प्रकरण! सुनेत्रा पवारांनी उचललं कठोर पाऊल; आढावा बैठकीत निर्देश

Pahalgam Tourist Places Reopen : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर बंद केलेली १४ पर्यटनस्थळे पुन्हा सुरू होणार!

SCROLL FOR NEXT