सातारा

कऱ्हाड तालुक्यातील गमेवाडीच्या शिवारात मृतावस्थेत बिबट्या आढळल्याने नागरिकांत घबराट

हेमंत पवार

कऱ्हाड (जि. सातारा) : गमेवाडी (ता. कऱ्हाड) येथील माळ नावाच्या शिवारात बिबट्या मृतावस्थेत आज (मंगळवारी) दुपारी आढळून आला. अचानक बिबट्या दिसल्याने शेतकरी घाबरले. त्यांनी तातडीने पोलिस पाटील, वन विभागाला माहिती दिली. वन विभागाचे कर्मचारी, अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बिबट्या ताब्यात घेवून पुढील कार्यवाही केली.  

घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, गमेवाडी येथील तळीचा माळ शिवारात हणमंत चंद्रु जाधव यांच्या शेतातील उसाची साखर कारखान्याला ऊसतोड सुरु आहे. त्याला अडचण येवू नये म्हणून श्री. जाधव हे त्यांच्या शेजारील चंद्रकांत गोविंद जाधव यांचा ऊस दाबायला गेले. ऊस दाबत असतानाच जाधव यांना शेतातील वरंब्यावर बिबट्या पडलेला आढळला. त्यांना काहीकाळ सुचायचेच बंद झाले. तो जागचा हलला नाही त्यामुळे तो मृतावस्थेत पडला असावा, असा त्यांचा अंदाज झाला. 

त्यादरम्यान ते गमेवाडीत आले. त्यांनी पोलिस पाटील चंद्रकांत जाधव यांना फोन करुन संबंधित घटनेची माहिती दिली. पोलिस पाटील यांनी वन विभागाला माहिती दिली आणि ते जाधव यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, तातडीने वनरक्षक मंगश वंजारी, शंकर राठोड, माजी सरपंच करण जाधव हेही तेथे दाखल झाले. वन विभागाचे वनक्षेत्रपाल अ. पो. गमरे यांनी घटनास्थळी भेट दिली. बिबट्या मृतावस्थेत पडल्याची माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरली. त्यामुळे त्याला बघण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court: आधी सेक्स नंतर ब्लॅकमेल... असंच सुरू राहीलं तर सुसंस्कृत समाजात राहणे कठीण; हायकोर्टाने दिले कारवाईचे आदेश!

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये आशा स्वयंसेविकांचे काळे कपडे घालून आंदोलन

Rahuri By-Election: अक्षय कर्डिलेंवरच भाजपचा भरवसा; राहुरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर, विखे पिता-पुत्रांची कर्डिलेंनाच पसंती?

ठरलं तर मगमधील प्रियासाठी सायलीच्या खऱ्या आईने बनवला खास पदार्थ, अभिनेत्री पोस्ट शेअर करत म्हणाली...

Crime News : अंधश्रद्धेचा कहर! मुलगा बरा व्हावा म्हणून आईने भोंदू मांत्रिकाच्या सांगण्यावरुन दिला मुलीचा नरबळी, राज्यात खळबळ

SCROLL FOR NEXT