Satara Latest Marathi News 
सातारा

..अन्यथा 'मराठवाडी'च्या जलाशयात सत्याग्रह; नरेंद्र पाटलांच्या बैठकीत ठरली लढ्याची रणनीती

राजेश पाटील

ढेबेवाडी (जि. सातारा) : येत्या दहा दिवसांत सातारा व सांगली जिल्हाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन सर्व शिल्लक प्रश्नांची तड लावावी, अन्यथा 11 व्या दिवशी मराठवाडी धरणात जलसत्याग्रह सुरू होईल, असा इशारा नुकताच मराठवाडी धरणग्रस्तांच्या बैठकीत देण्यात आला. 

मराठवाडी धरणग्रस्तांच्या प्रतिनिधींनी येथे आण्णासाहेब पाटील विकास फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, माजी आमदार नरेंद्र पाटील यांची भेट घेतली. विविध प्रलंबित प्रश्नी चर्चा करत लढ्याची पुढील दिशाही या वेळी निश्‍चित करण्यात आली. धरणांतर्गत विविध गावांतील प्रतिनिधी जितेंद्र पाटील, जगन्नाथ विभूते, आनंदराव मोहिते, सुरेश मोहिते आदींनी शिल्लक प्रश्नांचा पाढा वाचला. माहुली गावठाणात पुनर्वसित होणाऱ्या उमरकांचन येथील धरणग्रस्त कुटुंबांच्या नाकातोंडात पाणी शिरण्याची वेळ आली, तरीही अजून त्यांच्या मागण्यांवर निर्णय झालेला नाही. सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी धरणस्थळी भेटी दरम्यान दिलेले संयुक्त बैठकीचे आश्वासन पूर्ण केले नाही. 

शेती धरणाच्या पाण्यात बुडल्याने जिंती- सावंतवाडीचे शेतकरी देशोधडीला लागले आहेत. उमरकांचनच्या गावठाणात नागरी सुविधांची कामे निकृष्ट झाली आहेत. मेंढच्या गावठाणातील वीज वाहिनी हलविण्याबाबत निर्णय होत नाही. कऱ्हाड- पाटण तालुक्‍यांत पुनर्वसित धरणग्रस्तांच्या माथी खडकाळ- मुरमाड जमिनी मारण्याचा प्रयत्न सुरू आहे आदी तक्रारी करण्यात आल्या. त्यानंतर सातारा व सांगली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाठवून प्रश्न मार्गी लावण्यास दहा दिवसांची मुदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. अकराव्या दिवशी कोणतीही पूर्वसूचना न देता जलसत्याग्रह आंदोलन सुरू करण्याचे ठरले. 

प्रत्येक गोष्ट कुठंपर्यंत सहन करायची यालाही काही मर्यादा असते. धरणग्रस्तांची सहनशीलता आता संपली आहे. दहा दिवसांत योग्य हालचाल न झाल्यास जलाशयात उतरून आंदोलन सुरू होईल.

-नरेंद्र पाटील, (संस्थापक, अध्यक्ष आण्णासाहेब पाटील विकास फाउंडेशन) 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Bomb Case: सीसीटीव्हीतील व्यक्ती स्वतःहून पोलिसांसमोर; पण निघाला MR, बॉम्ब प्रकरणाशी काहीही संबंध नाही!

Latest Marathi News Live Update : नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी शुभम खैरनार वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया प्रशिक्षण केंद्र चालवत असल्याचं समोर

Breaking : हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव पंजाब किंग्सच्या सामन्याला मुकणार; Mumbai Indians चं नेतृत्व कोण करणार?

Raj Thackeray: केंद्राचा एकछत्री कारभार विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर घाला... 'NEET' पेपरफुटीवर राज ठाकरेंचा संताप, सरकारवर जोरदार हल्ला

Yerwada Prison Escape : येरवडा खुल्या कारागृहातून जन्मठेपेचा कैदी फरार; आठवड्यातील दुसरी घटना, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT