Satara Latest Marathi News 
सातारा

पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेला पकडणाऱ्या जांबाज पोलिसांना गृहराज्यमंत्र्यांचा कडक 'सॅल्यूट'

गिरीश चव्हाण

सातारा : पुणे येथील कुख्यात गुंड गजा मारणेला मेढा परिसरात अटक केल्याप्रकरणी आज ग्रामीण गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी मेढा पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक अमोल माने आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. सत्कारादरम्यान कारवाईत सहभागी झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना विशेष शौर्य पदक देण्यासाठीचा प्रस्ताव महासंचालकांकडे पाठविण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना केल्या. 

या वेळी अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, उपअधीक्षक गृह राजेंद्र साळुंखे, स्थागुशाचे निरीक्षक किशोर धुमाळ आदी उपस्थित होते. खुनाच्या गुन्ह्यातून सुटल्यानंतर गजा मारणेने जोरदार शक्तिप्रदर्शन करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी दाखल गुन्ह्यात जामीन मिळाल्यानंतर मारणे व त्याच्या साथीदारांवर दरोड्याचा गुन्हा पुणे ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आला होता. हा गुन्हा नोंद झाल्यापासून मारणे हा फरारी होता. 

फरारी असणाऱ्या मारणेला गेल्या आठवड्यात मेढा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल माने, पोलिस हवालदार जितेंद्र कांबळे, इम्राण मेटकरी, अमोल पवार यांनी पाठलाग करत पकडले होते. या कारवाईत सहभागी झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा आज राज्यमंत्री देसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याच दरम्यान पोलिस हवालदार मोना निकम यांनी नऊवारी साडी परिधान करत हिरकणी कडा सर केल्याबद्दलही श्री. देसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Resignation Letter : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याचे पत्र व्हायरल; निवडणूक आयोगाने सांगितले सत्य

Electronics Prices: दसरा-दिवाळीपूर्वी ग्राहकांना मोठा धक्का; एसी, एलईडी, फ्रीज, वॉशिंग मशिनच्या किमती वाढणार

Kolhapur Politics: ठरावदारांच्या ओळख परेडवरून राडा; मंत्र्यांसमोरच वादावादी; राष्ट्रवादी-भाजप कार्यकर्ते धावले अंगावर

ST Bus: विद्यार्थ्यांची पायपीट थांबणार! दुर्गम भागात एसटीच्या १०० 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी' मिडी बस धावणार

Kolhapur News: माझ्यासाठी भरपूर केलंस, माफ कर’, पत्नीला मेसेज पाठवून संपवलं आयुष्य; सावकाराकडून जाच

SCROLL FOR NEXT