सातारा

मंत्रीपदाचा डामडौल बाजूला ठेऊन गृहराज्यमंत्र्यांची अपघातग्रस्त महिलेला मदत

उमेश बांबरे

सातारा : साताऱ्यातील जुन्या आरटीओ चौकात एसटी आणि कारचा अपघात झाला. त्याचवेळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या गाड्यांचा ताफा तेथून निघाला होता. अपघात झालेला पाहून मंत्री देसाई यांनी गाड्यांचा ताफा जागीच थांबविला. गाडीतून खाली उतरले अन्‌ त्यांनी प्रथम जखमी महिलेची चौकशी केली. तिच्या लहान मुलाला उचलून घेतले. तसेच तेथील पोलिस अधिकाऱ्याला या जखमींना तत्काळ हॉस्पिटलमध्ये नेण्याच्या सूचनाही केल्या. मंत्रीपणाचा डामडौल बाजूला ठेऊन मंत्री देसाई यांनी गाडीतून खाली उतरून अपघातग्रस्तांना केलेली मदत अनेकांना भावली. 

साताऱ्यातील जुन्या आरटीओ चौकात एसटी आणि कारचा अपघात झाला होता. त्यामुळे एकच गर्दी झाली होती. त्याचवेळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या गाड्यांचा ताफा तेथून निघाला होता. अपघात झालेला पाहून मंत्री शंभूराज देसाई यांनी गाड्यांचा ताफा जागीच थांबविला. गाडीतून खाली उतरले अन्‌ त्यांनी प्रथम जखमींची चौकशी केली. अपघातातील महिला अतिशय घाबरलेली होती. तिच्या समवेत एक लहान मुलही होते. मंत्री देसाई यांनी प्रथम जखमी महिलेची आस्थेवाईकपणे चौकशी केली. लहान मुलाला उचलून घेतले. तेथील पोलिस अधिकाऱ्यांना या जखमींना तत्काळ हॉस्पिटलमध्ये नेण्याच्या सूचना केल्या. 

मंत्री देसाई यांनी जखमींसाठी पाणी आणण्याच्या सूचना केल्या. त्यांच्या ताफ्यातील एका पोलिस कर्मचाऱ्यांनी तातडीने पाण्याची बाटली आणून दिली. अपघात झालेल्या ठिकाणी बघ्याची गर्दी तर होतीच, पण एसटी चालकाचीच चुकी असल्याचे तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी सांगितले. हे एकूण अपघातग्रस्त एसटीच्या चालकास शंभूराज देसाई यांनी चांगलेच सुनावले. मंत्री देसाई यांनी वेळीच दाखविलेली माणुसकी उपस्थित अनेकांना भावली. मंत्रीपणाचा डामडौल बाजूला ठेऊन मंत्री देसाई यांनी गाडीतून खाली उतरून अपघातग्रस्तांना केलेली मदत खऱ्या अर्थाने लोकनेत्यांचा वारसा ते चालवत असल्याचे पहायला मिळाले.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs NZ: फायनलमध्ये अहमदाबादची खेळपट्टी कोणाला मदत करणार? समोर आले महत्त्वाचे अपडेट्स

UPSC success story : यूट्युबवर ऑनलाईन व्हिडिओ पाहून कोल्हापूरच्या आरुषा पाटीलने युपीएसीमध्ये मिळवलं यश, तुम्हीही म्हणालं...

Baba Khan: धाड.. धाड.. धाड.. घरावर बेछूट गोळीबार; घटनेत पोलीसही जखमी, प्रसिद्ध इन्फ्लुएंसरसोबत काय घडलं? व्हिडिओ व्हायरल

Women’s Day Finance Planning: महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी टर्म विमा आणि निवृत्ती नियोजन का आवश्यक?

Nagpur Crime News : कामठीत बनावट नोटांचा पर्दाफाश; तीन व्यापाऱ्यांना अटक, कसा उघडकीस आला प्रकार?

SCROLL FOR NEXT