Satara Latest Marathi News 
सातारा

कोरोनाची दुसरी लाट आली, तरीही रुग्णवाहिका नाही; माजी मुख्यमंत्र्यांचा अधिकाऱ्यांवर संताप

सचिन शिंदे

कऱ्हाड (जि. सातारा) : आमदार निधीतून कऱ्हाडसाठी देण्यात येणाऱ्या रुग्णवाहिकेचे नक्की काय झाले, त्याचा सविस्तर अहवाल त्वरित द्यावा, रुग्णवाहिका नको असल्यास पालिकेने तसा ठराव द्यावा, तो निधी अन्य कारणासाठी वळवता येईल, अशा कडक शब्दांत माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आजच्या आढावा बैठकीत पालिका अधिकाऱ्यांना सुनावले. 

आमदार चव्हाण यांच्या निधीतून कऱ्हाड व मलकापूर पालिकांना दोन वेगवेगळ्या रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. त्यात मलकापूरला रुग्णवाहिका आली. मात्र, सहा महिने झाले तरीही कऱ्हाडची रुग्णवाहिका आलेली नाही. त्यावरून आमदार चव्हाण यांनी थेट अधिकाऱ्यांनाच धारेवर धरले. कोविडच्या पहिल्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कऱ्हाड शहरासाठी पृथ्वीराज चव्हाण यांनी पालिकेला रुग्णवाहिकेसाठी निधी उपलब्ध करून दिला. कोरोनाची दुसरी लाट आली, तरीही पालिकेत रुग्णवाहिका आलेली नाही. ते लक्षात येताच आमदार चव्हाण यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना जाब विचारला. काहीशा संतापलेल्या व अत्यंत कडक भाषेत अधिकाऱ्यांना त्यांनी सुनावले. शासनाच्या दिरंगाईने रुग्णवाहिका शहरवासीयांसाठी आली नसेल, तर तसा खुलासा पालिका अधिकाऱ्यांनी त्वरित करण्याचे आदेश आमदार चव्हाण यांनी दिले. 

रुग्णवाहिका का आली नाही, याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, असे आमदार चव्हाण यांनी पत्रकारांनाही सांगितले. श्री. चव्हाण म्हणाले, "कऱ्हाड व मलकापूर शहरांसाठी प्रत्येकी एक रुग्णवाहिका मंजूर होती. त्यानुसार मलकापूरची रुग्णवाहिका आली. मात्र, कऱ्हाडची रुग्णवाहिका आलेली नाही. शहरातील नागरिकांची सेवा करण्यासाठी रुग्णवाहिका दिली होती. ती पालिकेने ताब्यात घेतलेली नाही, त्याचे कोडे आहे. याबाबतचा अहवाल मागितला आहे.'' 

कऱ्हाड पालिकेला रुग्णवाहिका नको असेल, तर त्यांनी तसा ठराव करून द्यावा. तो निधी शहरातील अन्य कामासाठी वळवता येईल. रुग्णवाहिका न वापरण्याबाबत कोणाचा दबाव असेल, तर तसेही त्यांनी स्पष्ट करावे. 

- पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price Today: महाराष्ट्रापेक्षा गुजरातमध्ये पेट्रोल तब्बल 10 रुपये स्वस्त! तुमच्या शहरात आजचा दर किती?

Kagal Politics : हसन मुश्रीफ आणि घाटगे एकत्र कसे आले? CM फडणवीसांच्या कागल दौऱ्यापूर्वीच समरजितसिंह घाटगे यांनी स्पष्टच सांगितली पडद्यामागची कहाणी

Bhandardara Accident: भंडारदरा पर्यटनाला गालबोट! मद्यपींची हुल्लडबाजी, भरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत तरुणीचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आपल्या पथकाने केलेल्या कामगिरीचा मला अभिमान वाटतो- पंतप्रधान मोदी

Buldhana Farmer Loan Waiver: बुलडाण्यात १.१६ लाख पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, ६७ हजार ई केवायसी प्रलंबित

SCROLL FOR NEXT