Satara Latest Marathi News 
सातारा

वीज बिलावरुन शिवसैनिक आक्रमक; वसुली अधिकाऱ्यांच्या गाडीवर केली दगडफेक

ऋषिकेश पवार

विसापूर (जि. सातारा) : सध्या वीज बिल वसुलीसाठी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू केली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच पुसेगावसह परिसरातील बऱ्याच थकीत ग्राहकांचे कनेक्शन कोणतीही पूर्वसूचना न देता अरेरावीची भाषा वापरत तोडले जात आहे. 

या कारवाईमुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी थेट वीज वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांची गाडी फोडली. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव यांनी कोणत्याही परिस्थितीत पूर्व सूचना दिल्याशिवाय एकाही ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित करू देणार नाही, असा इशारा महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला. यावेळी प्रताप जाधव म्हणाले, सध्या घरगुती आणि कृषी पंपाच्या वीज बिलांच्या वसुलीचा प्रश्न गंभीर बनला आहे. येथील नागरिक, व्यावसायिक, शेतकरी लॉकडाऊन तसेच अवकाळीच्या संकटातून सावरत असतानाच महावितरणने थकीत वीज ग्राहकांना कोणतीही पूर्व सूचना न देता अरेरावीची भाषा वापरात वीज तोडणीचा एक कलमी कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. 

महावितरणने ग्राहकांना वीज बिल भरण्यासाठी किमान दोन दिवसांची मुद्दत द्यावी. तसेच गोर-गरीब जनतेवर अरेरावी व दमदाटीची भाषेचा वापर करू नये अशा सूचना महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या. सध्याची ग्रामीण भागातील आर्थिक परिस्थिती पाहता राज्य सरकारने दुष्काळी भागातील वीज तोडणीबाबत वेगळा निकष लावून दुष्काळी भागातील जनतेला न्याय द्यावा, अशी मागणी देखील यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केली. दरम्यान, महावितरणने आपल्या कारभारात सुधारणा न करता, तसेच कोणतीही पूर्वकल्पना न देता अरेरावीची भाषा वापरात एका जरी ग्राहकांची वीज कनेक्शन तोडले तर शिवसेना याचा तीव्र विरोध करेल, अशी माहिती जाधव यांनी यावेळी दिली.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT